आशा (aasha)आशाच्या आनंदाला आज कसलाच सुमार नव्हता कारण ज्या दिवसाची ती इतक्या उत्कटतेने वाट पाहत होती तो तिचा आजचा समाधानाचा दिवस होता आणि निव्वळ त्यामुळेच ती खळखळून निघाली होती .आशा आपला आनंद स्वतःपुरता न ठेवता मासे विकत घ्यायला येणाऱ्या गिऱ्हाईक ना 2 3मासे अधिक देऊन देत होती.आज तिचे शेवटचे मासे विकणे होते.मासे विकणाऱ्या  जागेवर ती शेवटची बसणार होती.

ती रोजची गिऱ्हाईक तिला आता पुन्हा भेटणार नव्हते. तिचा संघर्ष आज संपुष्टात येऊन मुलीच्या जीवावर ती नवे आयुष्य निवृत्तीचे आयुष्य जगणार होती.आणि ती ह्यासाठी जास्त खुश होती कारण तिचा नाखवा सुधा आज मासेमारी पासून निवृत्ती घेणार होता हे दांपत्य आपल्या डॉक्टर मुलीसोबत मुंबईत स्थायिक होणार होते.कधी एकदा संध्याकाळ होते व कधी एकदा नाखवा आणि लेक दोन्ही जण डोळ्यासमोर येतील असे तिला झालेले.तिचा नाखवा गेल्या सात दिवसांपासून खोल समुद्रात गेला होता.

आज आणलेले त्याच्या वाट्याचे मासे ते स्वतः न खाता त्यांच्या पडत्या काळात जेव्हा जेव्हा त्यांना मदत केलेली त्यांना भेट म्हणून देणार होते.बाजूलाच बसलेल्या भानू कोलिणी चे ती आभार मानत होती कारण नकळत पणे तिने सुधा आशाचा कधी  धंदा नाही झालं तर स्वतकडची गिऱ्हाईक तिच्याकडे पाठवत होती आणि आशाला पण ह्याची जाणं होती पण परिस्थितीपुढे ती सुधा हतबल होती.

आज तू नसती तर माझं कस झाल असत वैगरे आशा हळव्या गोष्टी तिच्याजवळ करत होती आणि भानू ने तिला मधेच रोखून काय झालंय केलंय हे विसरून पुढचं आयुष्य बघ म्हणून बोलत होती.आणि तितक्यात पाऊस सुधा सुरू झाला होता. आशा म्हणाली आजचा दिवस खास आहे बघ भानू आज साक्षात वरुण देव सुधा माझ्या आनंदात सहभागी झाले आहेत, असे बोलून ती जागेवरून उठली आणि विशाल आकाशाकडे हात जोडून कृतज्ञता व्यक्त करीत राहिली.

पाऊस जरा जास्तच सुरू झाला आणि आशाला आपल्या मुंबईकडून येणाऱ्या मुलीची व खोल सागरातून घरी  येणाऱ्या नाखव्याची चिंता सताऊ लागली.तिने आपल्या टोपली तले काही मासे भानू ल दिले व ती त्वरित घरी जायला निघाली.तिला भूक तर आज अजिबात नव्हती कारण आनंदाने तिचे पोट गच्च भरले होते.पण तरीही वाढता पाऊस तिचे आनंदी मन विचलित करत होता.न राहवून तिने आपल्या मुलीला फोन केला पण पावसामुळे फोन लागण्यातही व्यत्यय येत होते मग नंतर तिने मुलीच्या वसतिगृहात फोन केला तेव्हा तिला कळले की आजच सकाळी तेथून ती निघाली.

आईच मन भित होत तसच एका ठिकाणी एक नाख्व्याची कोळीण सुधा चलबिचल झाली होती.तरीसुद्धा तिचा आतला आवाज तिला सांगत होता आशा दोघेही घरी सुखरूप येतील करून .आणि मग तिने संध्याकाळच्या स्वयंपाकाची व गोडधोड बनवण्याची तयारी सुरू केली.तितक्यात दारावर कोणी तरी थाप मारली आणि मंद आच करून आशा दरवाजा उघडून पाहते तर काय तिची मुलगी तिच्या समोर उभी होती.आशाने मुलीला घट्ट मिठीत घेत कुरवाळू लागली आणि बघता बघता दोघींच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले.तेव्हा जिन्यावरून उतरणाऱ्या काकांनी दोघांचं आलिंगन दूर सारत डॉक्टर अशी हाक मारत तिचे स्वागत केले.तो प्रसंग ती डॉक्टर म्हणून मिळणारा सन्मान आशाला खूप काही देऊन गेला.

तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तसाच खिळून राहत असताना त्या काकांच्याही डोळ्यात नकळत पाणी आले.आणि ते आशा आणि तिच्या नाखवाची संघर्ष मय कथा मुलिसमोर बोलू लागते तिची मुलगी सुधा ते सर्व ज्ञात होती पण तरीही आजचा दिवस खूप खास होता.मग दोघीही घरात येऊन आई लेकीच्या गप्पा सुरू होतात  आणि दोघीही जणी जीवाची पर्वा न करता खोल समुद्रात गेलेल्या नखव्याची वाट पाहत बसतात.

पाऊसाचा जोर तसाच कायम राहिला .वातावरणातील बदलामुळे समुद्रात कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन एक मोठं वादळ भयाण काहीतरी व्हायचं वृत्तान्त देत टीव्ही वर चालू होत.आशाला आता कशातच रस राहिला नव्हता ना बनवलेल्या जेवणावर ना खिरीवर ना मुलगी घरी आल्यावर.तिचं मन आता तिच्या नवऱ्याच्या परत येण्यासाठी आतुरले होते.तिचा जीव राहत नव्हता.ती तशीच ताबडतोब निघाली आणि हातात छत्री सुधा न घेता किनाऱ्यावर जाऊ लागली. तिच्या मुलीने तिला काळजी न करण्याचे निश्चित प्रयत्न केले मात्र ह्यात ती कोणाचंही ऐकणार नव्हती.जोराचा वाहणारा वारा सोबत धूळ कचरा लेवून बेभान वाहू लागला होता.

आशाला दूरवर कुठलीच नाव जवळ येताना दिसत नव्हती.ठरलेल्या वेळेप्रमाणे तिच्या नाखव ची  नाव किनाऱ्यावर येणं अपेक्षित होते.आणि बराच वेळ झाला तरी आपला नाखवा न आल्याने तिचे हातपाय गळून ती श्रध्देने पुजणाऱ्या सर्व देवांना साकडे घालत होती.

 तसेच गावातील सर्वच आप आपल्या दूरवर गेलेल्या होडी व माणसे सुखरूप यावेत ही देवाकडे आर्जव करू लागली.आशा सारख्या अजुन आशा आपल्या आपल्या धन्याची वाट पाहत किनाऱ्यावर आल्या होत्या.मात्र रात्र झाली तरीही कोणत्याच परतीला येणाऱ्या होड्याचा थांगपत्ता नव्हता.मनात दुःख चिंता काळजी साठवून तशाच जड अंतःकरणाने आशा व तिची मुलगी घराकडे वळू लागले.सकाळी इतक्या आनंदात असणारी आशा आता पार कोमेजून गेली होती तिच्या सर्व आनंदावर विरजण पडले होते.दोघीही माय लेकी एकमेकांच सांत्वन करत एकमेकींना धीर देत तशाच बसून राहिल्या.

बसल्या जागीच कशी डुलकी लागली हे ही त्या दोघींना कळले नाही.आणि तरीही अधून मधून जागत सकाळ होण्यासाठी वाट बघत राहिल्या.सकाळी तरी कुठून तिचा नाखवा त्याची बोटं त्याला दिसेल ही तिला एक आशा होती.सकाळ झाली आणि पाऊस सुधा कमी झाला होता.मात्र कुठून कोण दवंडी पिटत आला आणि दुःखत वार्ता पसरवत म्हणाला समुद्रात चक्रीवादळाने मोठं नुकसान करता करता काही बोटी तशाच गिळंकृत झाल्या.आशा आता स्वतः स्वतःची समजूत काढत बसली होती .

ती आपल्या नवऱ्याची बोट नसावी म्हणून स्वतः स्वतःच सांत्वन करत राहिली.आणि टीव्ही वरील वाहिन्या वादळा शी संदर्भात वृत्तान्त देत असताना.अनेक बोटी परतीच्या प्रवासाला निघाले असताना कसे वादळाने झपाटून गिळंकृत केले हे वारंवार सांगत राहिल्या. वादळ जाऊन चार पाच दिवस उलटले तरीही तिच्या नाखव्याची बोट काही आली नव्हती.पाहिलेली सर्व स्वप्ने आता एका क्षणात बेचिराख झाली होती.

मुलीने इतक्या विनवण्या करून सुधा ती तिच्यासोबत मुंबई जायला तयार नव्हती.शेवटी मुलगी निघाली तिच्या नव्या प्रवसाला.आणि आशा?

आशा ला तरीही आशा होती तिचा नवरा एक दिवस नक्की येईल नावेतून सोबत मेहनतीने पकडलेले सोने घेऊन.अर्थातच ती नाव त्या भयाण वादळात कधीच बुडाली होती.मात्र आशा रोज त्या किनाऱ्यावर जात होती आणि अशीच कोणती नाव किनाऱ्यावर येते का हे पाहत होती?

तिला नंतर मिळणारे सुख कदाचित नियतीने तिच्याकडून हिरावून घेतले होते .आणि आता ती तिच्या नवऱ्याच्या शेवटच्या श्वासपर्यंत वाट पाहत राहण्यासाठी तयार होती.कारण तिच्या नवऱ्याने जाताना तिला सांगितले होते मी लवकरच येईल आणि मग आपण सुखाचे दिवस मुलीसोबत मुंबईत घालू खूप फिरू आणि छान राहू.कदाचित तिला आजही आस आहे ती नाव पुन्हा किनाऱ्यावर येण्याची.

Image Credits 
unsplash-logoLina Trochez

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या