रमा (Rama)आज रमाची सकाळपासून लगबग सुरू होती.तिने घाईघाईत तिच्या मुलीला जेवू घातले व शाळेची तयारी करून शाळेत सोडून आली जणू तिला कुठली एक्स्प्रेस ट्रेन धावत पकडायची होती.तशी रमा शिकलेली ही नव्हती.पण व्यवहारात हुशार होती, तुणतूनी होती, तिच्या संपूर्ण परिसरात तिला नावलौकिक मिळाला होता पतीच्या निधनानंतर सुधा ती जराही डगमगून न जाता आता पतीच्या जागेवर  स्वतः भाजी विकुन आपल्या त्रिकोणी परिवारासह राहत होती.भाजीचा व्यवसाय तसा बरा चालत होता पण तरीही तिच्या साठी तो तुटपुंजा होता तिला आपल्या दोन्ही मुलींसाठी भरपूर पैसे कमावून त्यांचं भविष्य उज्ज्वल करायचं होत.म्हणून तिचा दिवसभर काम करून रात्रीच्या प्रहरात सुद्धा कुठे काम असेल तर ती करत होती.एकंदरीत ती संसारासाठी जे वाटेल ते करायला तयार होती.   

आपल्या मोठ्या मुलीला शाळेत सोडून आल्यावर तिने बाजूलाच राहणाऱ्या विमल काकू कडे धाव घेतली व आपल्या छोट्या दूध पित्या दुसऱ्या मुलीला घेऊन घरात आली. रमाचे घर म्हणजे अठरा विश्वे दारिद्र्य च पुजलेले जणू .तो स्टोव्ह ज्याठिकाणी  होता तिथे जणू डांबर

लेप लावलेले पट्टे वर कौला पर्यंत जात होते.न्हाणीघर कसले एक फाटका पडदा  तसाच आडोशाला बांधून ठेवला होता .घरात तुरळक भांडी होती.कपडे ठेवायला एक पत्र्याची पेटी होती.त्याचावर मुलींचे काही कपडे , तिच्या नवऱ्याचा फोटो मात्र तिने जीवापाड जपून ठेवला होता.जणू काही त्या तिचा फाटका संसार त्या फोटो मुळेच काहीसा लखलखता होता.आज ती जेथे भाजी विकत होती तिथल्याच  परिसरातील  एका प्रतिष्ठित माणसाकडे आज वाढदिवस प्रीत्यर्थ पार्टीचे आयोजन केले होते.तेथेच तिला जादा काम म्हणून भांडी घासण्यासाठी जायचे होते.

तसे तिच्याकडे जुनेच कपडे होते त्यातली एक साडी  दिसायला बरी होती रंगीत आकर्षक होती आणि ती साडी आपल्या पत्र्याच्या पेटा रातून काढून नेसून आपल्या छोट्या जीवाला कडेवर घेऊन निघाली निघताना तिने विमल काकूंना हाक देत यायला उशीर होईल व तसेच गुड्डी शाळेतून आली की तुमच्या घरी ठेवा असे सांगितले.रमा ला शेजारी पाजारी तसे बरे भेटले होते ते म्हणतात ना गरिबांच्या वस्तीत जी माणुसकी आणि प्रेमाची श्रीमंती असते त्याला कसली जोड नाही.रमा निघाली .वाढदिवसासाठी खूप मोठे आयोजन केले होते.आयुष्यात असे सोहळे वाट्याला खूप कमी आल्याने रमा तशी कावरीबावरी झाली होती.

तिच्यासारख्या अजुन दोन तीन  जणी तिथे आल्या होत्या.तिथे सर्वांना काम वाटून देण्यात आली होती.रमा आपल्या लहान मुलीला बाजूलाच ठेवून कामात मग्न झाली.रमाचे लहान मूल रांगत रांगत इथे तिथे सैरा वैरा पळत होते.


रमा आपल्या कामातून उठून पुन्हा आपल्या मुलीला जागेवर बसवत होती.रमा तिथे गेल्यापासून  तिला तेथे कुणी चहा दूरच पण पाण्याचेही विचारले नव्हते.तसेही गरीब आणि निराधार लोकांना समाज नेहमी तुच्छ लेखतो ह्याची रमा ल पूर्ण जाणं होती पण निव्वळ आपल्या दोन इवल्याश्या भविष्या साठी तिला सर्वकाही मानापमान सहन करून परिस्थितीशी झुंज द्यावी लगत होते.

वाढदिवसा घरी तशी पाहुण्यांची रेलचेल सुरू होती आणि अधूनमधून एखादा घरचाच कोणी ह्या सर्वांना सूचना देत होता .त्याच्या बोलण्याचा स्वर तीव्र होता हे रमा सोबत सर्वांना कळून आले होते .त्या सर्वाचे काम सुरू असतानाच एक गदारोळ माजला आणि जो तो जिन्या चा खालच्या बाजूने जाताना दिसला . वाढदिवसा तला आनंद आता गदारोळात रूपांतरित झालं होता.

तितक्यात रमा ची नजर ही आपल्या लहान मुलीकडे गेली आणि आपली मुलगी जागेवर नसल्याने ती थोडी अस्वस्थ झाली.आपल्या मुलीला सर्वत्र शोधू लागली आणि शोधता शोधता तिची नजर एकत्रित जमलेल्या घोळक्या कडे गेली. ती सुधा त्वरित खाली उतरली तर काय तेथे रमाचीच रांगणारी ,जिच्यासाठी हा सगळा ती खटाटोप करीत होती ती तिची मुलगी पडलेली दिसली घोलक्यातल्याच कोणीतरी तिला उचललेले होते.

त्या अजूनही स्थावर न झाल्या टाळू तून रक्त बाहेर येत होत.आईचा जीव त्या तांहुल्या जीवकडे धावत गेला तिने त्या रडणाऱ्या जीवाला घट्ट मिठीत घेतले .काय करावे काय नाही हे सुचत नव्हते.मग त्या प्रतिष्टीतांपैकी एकाने डॉक्टर ल कॉल करून घरी बोलावून घेतले.रमाचे ते तांहुळे रांगत रांगत कधी सरसकट खाली आले हेच कोणाला कळले नाही.डॉक्टर ने मलमपट्टी करून गोळ्या वैगरे देऊन तिला बाळाची काळजी घायव्यास सांगितली.

तेथून ती निघाली घरी आल्यावर मात्र आपल्या नवऱ्याच्या फोटो ल हातात घेऊन ढसाढसा रडली.तिची तांहुली तर डॉक्टर च्या डोसा मुळे केचाची झोपली होती पण रमाला मिळालेलं डोस ?

तिच्या बाळाचे घाव तर भरले असावेत त्या डॉक्टर मुळे पण मात्र नंतर रामाला मिळालेल्या निव्वळ घावांच काय?

आल्यापासूनच पोटात काही नसताना लगबगीने काम करणाऱ्या त्या सर्वच बायकांचं काय?

तिला मिळाला तो अपमान?

तिला मिळाले ते टोमणे?पुन्हा कधी कुठे काम करू नकोस असे नपुंसक सल्ले?

कुठे घेऊन जाणार होती ती हे सर्व?तिच्या मुलींच्या भविष्यासाठी उभारलेले हेच होते का ते पोकळ खांब?

खरच समजत  गरीब असणे चुकीचे आहे का की तो एक गुन्हा आहे ?

का नाही आपण सर्वांना समान वागणूक देऊ शकत?

का नाही आपण रमाला आणि तिच्या मुलींच्या भविष्यासाठी काही करू शकत?

अशा असंख्य रमा आहेत खरच त्यांना एक हात नाही पण एक बोट देऊन तर आपण त्यांना आधार देऊ शकतो.
म्हणजे मग कोणत्या प्रतिभावान माणसांकडे रमाला जे सोसायला लागलं सहन करायला लागलं ते नाही कधी कोणाच्या वाट्याला येणार.


Image Credits unsplash-logoV Srinivasan

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या