अनपेक्षित घाव (भाग २) - Anpekshit Ghav part 2आज्या दचकून उठला, त्याचे कपडे रक्ताने माखले  होते, आपल्या बायकोला हाका मारू लागला,
 "राणी...राणी....". 

तो कुठे आहे, याच त्याला काही भान न्हवते, त्याला फक्त आपल्या राणी ला पाहायचं होत, डॉक्टर धावत आले आणि त्याला injection देऊन परत झोपवलं.

काही तासांनी डोळे उघडले, आपण इस्पितळात आहोत आणि आजू बाजूला खूप लगबग आहे त्याला जाणवलं, तो उठण्याचा प्रयत्न करू लागला. 
"आज्या झोपून राहा, उठू मग", आज्या ने वर पाहिले, त्याचाच मित्र होता, 

" राणी कुठंय ? तिच्याजवळ ने मला" 
"जीती हाय ना ती ?"

"अस काय बोलून राहिला, तूच वाचवलं की तिला" , आज्याचा मित्र अभिमानाने बोलू लागला

त्याला दुसरं काही सुचत न्हवत.
"राणी ला बोलाव"
"हो हो, तू आराम कर" 

काही वेळाने, पळत पळत ती आज्या जवळ आली, त्याचा हात हातात घेऊन विचारपूस करू लागली, आपल्या पतीला शुद्धीवर आल्याचं पाहुन तिचे अश्रू ओघळू लागले होते.

"मी एकदम ठीक हाय, तुला काही झालं नाही ना ?", तिच्या हाताला बांधलेल्या पट्टी कडे बघत तो म्हणाला.

"मी बी एकदम बरी हाय.."
"आराम करा, तुमासनी लय लागलंय, पडून रहा" 

पत्नीचा आवाज ऐकून, त्याची सर्व काळजी संपली होती, ती आपल्या सोबत होती याने तो निश्चिंत होऊन तिला पाहत पुन्हा झोपी गेला.

काही तासांनी. कसल्यातरी आवाजाने त्याला जाग आली, उठून बसला, गरमा गरम जेवण तिच्या हातून खाऊ लागला, 

आपल्या पती साठी ती काहीही करायला तयार होती, तो सुखरूप होता याहून आनंदाची गोष्ट दुसरी ती काय.

2 दिवसांनी घरी घरी आला तेव्हा, डोक्याला जाड पट्टी बांधली होती. तो चालू फिरू शकत होता, पण कामे करायला मनाई होती, डोक्याची जखम पूर्ण ह्यायला 20-25 दिवस जाणार होते.

4-5 दिवसात आज्याला गावचे लोक भेटून गेले होते.आता लोकांच्या अश्या प्रकारे भेटणे आणि बघण्यामुळे अवघडल्या सारख वाटत होत, जो तो मला भेटायला येतोय, बघायला येत आहे आणि विचारपूस करत आहे, मी अस काय केलय ? लवकरच काही तरी आहे, काही तरी होणार आहे अस त्याला लोकांच्या कुजबुजन्या वरून कळत होत.

रात्री जेवणे उरकल्यावर, दोघे जण कंदिलाच्या प्रकाशात एकमेकांना पाहत बोलत होते, खूप दिवसांनी हा निवांत वेळ मिळाला होता, 
"अजून,  दुखतंय का हो ?"
"न्हाय.."
"लवकरच तुमचा सत्कार होणार हाय"
"कशापायी? ते चोर हुडकून लावलं म्हणुन? त्यात तर सर्व गावकरी होते, माझाच सत्कार का बर?"
"तुमच्या पायी त्यांचा म्होरक्या मारला गेला, आणि 10 हजार ची रक्कम होती त्या गुंडावर, तालुक्यावरून साहेब येणार आहेत तुमचा सत्कार करायला"
तो काही बोलणार तेवढ्यात 
"आता जास्त विचार करायला नगं, जे मिळतंय ते नशीब समजून घ्यावं" 
"या तुमची मालिश करून देते"

अस म्हणून तीने विषय बदलायचा प्रयत्न केला
शुद्धीवर आल्यापासुन सर्व अनपेक्षीत गोष्टी घडत होत्या, त्या रात्री काय झालं? माझ्यावर वार कोणी केला? घरात कोण शिरलं होत? असे प्रश्न त्याला छळत होते, 

तिचा हात पकडून ओढलं
"मी काय न्ह्याय केलंय," , तो किंचाळला 
"त्या चोराचा पाठलाग करत होतो, 
आपला दरवाजा उघडा दिसला, मला वाटले चोर आपल्या घरात हाय मी दरवाजा उघडला आणि कुणीतरी वार केला मागून, तू होती घरी तेव्हा ? सांग ना? काय झालं? मला इस्पितळात कोणी नेलं? मी नाय मारलं कोणासनी, मग कोणी मारलं ?"

आज्याला ला गोधळलेला पाहून चिंता वाटू लागली, आणि कधी तरी खरं सांगावच लागणार होत, त्याच्या डोक्याला मार लागला होता. आई वडील गेल्यापासून तो आधीच खिन्न होता आणि त्यात हे अस घडलं होत.गोंधळ मिटवून त्याला सर्व काही खर सांगूंयात अस मनाशी पक्क करून तिने आज्याचे कडे पाहिलं,

"तुम्ही बसा, मी पाणी आणते मग समद सांगते"
पाणी आणायचा बहाणा करून, येणारे अश्रू पुसले, धीर एकवटला
आणि त्याच्या पुढ्यात जाऊन बसली.त्याच्या कडे पाहिलं.

"त्या रात्री मी घरीच होते, गावात आवाज सुरू झाले तेव्हा मला जाग आली मी खिडकीतून पाहू लागलें काय झालं, काही तरी इतुष्ट तर नाही ना? आणि चोर तर शिरलं नसतील ना ? काळजीपोटी म्या खिडकीतच होते तेव्हा अचानक घराच दार जोरानं  उघडल, म्या उश्या खाली चाकु ठेवलेला त्यो बाहेर काढला, चोर च होता तो, माझ्या अंगावर आला, धरलं अन भिंतीवर आपटलं, त्याने माझं केस ओढले आणि डोकं आपटल, लगीच म्या चाकूनं त्याच्या नरड्यावर चार वार केलं, तो खाली पडला आणि तडफडू लागला, म्या दरवाज्या मागं जो दांडूक घेतलं अन डोक्यात घालून त्या भामट्याचा जीव घेतला", बोलताना तिचे पूर्ण अंग कापत होते, अश्रू ओघळत होते, त्याने तिला जवळ घेतलं. 

"आता समद ठीक झालं हाय, आता कसली चिंता नाय"
आपल्या पत्नीने चोराचा सामना केला आणि त्याला ठार मारले हे ऐकून त्याला आपल्या बायको विषयी अभिमान वाटू लागला, आणि तिने केलेल्या धाडसाची तो तारीफ करू लागला.
नवऱ्याने प्रेमाने जवळ घेतल्याने तिला थोडा धीर पण एवढ्या सहजा सहजी विसरण्या सारखी ती न्हवती, आपल्या नवऱ्याच्या कुशीत खुप हलत वाटू लागलं होत.

"मग समदी जण माझा सत्कार का करणार आहेत अन त्या रात्री माझ्या वर कोणी हल्ला केला? दुसरा  कोणी चोर आला होता ?"

या प्रश्नाने घरात शांतता पसरली, ती काहीच बोलली नाही फक्त आपल्या नवऱ्या कडे आणि त्याच्या डोक्याला लागलेल्या जखमे कडे पाहत राहिली, आणि एका श्वासात बोलली

"मला माफ करा, मी लय वाईत आहे, मी लय मोठा गुन्हा केलाय, मला माफ करा धनी, डोक्याला लागलेला घाव तो माझ्या मुळं लागलंय"

त्याच्या पायावर पडली आणि रडू लागली, 
त्याला अजूनही काही कळत न्हवत नक्की काय झालं होत, तिला उठवून आधी शांत केलं.

"नक्की काय झालं मला समद सांग पाहू"
"त्या गुंडाला मारलं अजून कोणी दुसरं चोर असलं तर? त्याने हल्ला केला तर या भिंतीने चुलीत लाकडं दिली पेटवून, धूर बघून कोणी तरी येईल, आणि घराचा दरवाजा लावायला जाणार तेवढ्यात समोरून कोणीतरी धावत येताना दिसलं, मला वाटलं चोर असल, म्या दरवाज्या माग लपले आणि आत येताच त्याच्या डोक्यावर वार केला"

"राणी राणी..असा ओरडत माझा धनी खाली कोसळला...
मीच तुझ्यावर वार केला मला माफ कर ..."

 त्याला खूप आश्चर्य वाटले पण त्यात तिची चूक नसल्याचेही त्याला समजले, रात्रीच्या अंधारात कोणीही अस घरात शिरलं तर कोणीही घाबरेल, गैर समजुती मळे सर्व झालेले होत. मोठ्या मुश्किल ने राणी ला शांत केलं आणि तिला नीट समजावण्याचा प्रयत्न करु लागला. 
पण ती स्वतःला अपराधी मानत होती,तीच अंग पूर्णपणे गळून पडलं होत. इतके महिने तिने आज्याला सांभाळलं होत आता मात्र तिलाच आधाराची गरज होती, आणि ते काम फक्त तोच करू शकत होता. 

सकाळ झाली, तो उठला, ती सकाळची कामे आवरत होती, तिला हाक मारली. एका अपराघ्या सारखा पडलेला चेहरा करून ती त्याच्या जवळ आली. रात्रभर रडून डोळे लाल झाले होते.

"राणी, नको उदास राहू .. 
"राच्याला मी दरवाजा आपटत घरात आलो आणि तुला वाटलं मी चोर आहे, यात ना तुझी काही चूक आहे ना माझी"

"तू चुलीला आग लावलीस आणि माझं लक्ष घराकडं केलं, दार उघड दिसला, चोर आपल्या घरात शिरलं या रागानं मी घरात आलो पण तू आधीच त्याच्याशी सामना केला, तू लय मोठं काम केलं, तू लय हिमतीचा बाई माझ्या नशिबी आलियास, माझं भाग्य हाय ते. तुझ्या जागी दुसरं कोणी असती तर त्या गुंडानं तिला ठार केलं असत, आणि तुला काही झालं असत तर मी जागून तरी काय केलं असत?, आय आणि बाप गेले , मग तुझ्या शिवाय कसा जगलो असतो? मी मेलो असतो तरी..." 
"धनी....."  त्याच्या तोंडावर हात ठेवत त्याला मिठी मारली, मनसोक्त रडू लागली. काही वेळाने कुशीत झोपू गेली, 

इतके दिवस जी गोष्ट खिन्न करत होती, पतीला सर्व सांगितली आणि देह-भान त्याच्या कुशीत सोडून दिल. 

त्या नंतर सर्व हळू हळू पूर्ववत होऊ लागलं होत.जखम ही आता सुकली होती.

एके दिवशी गावात भटकून,घरी आल्यावर संध्याकाळच औषध-पाणी उरकून,तो घराबाहेरच्या खाटेवर पहुडला, मधू अंगण झाडायला आली, आपले पतीदेव महाराज आराम करत आहेत, हे काही तिला खटकत होत, संध्याला कोणी झोपलेल तिला आवडत नसे.

डोळे वटारत ती आज्याच्या बाजूला जाऊन उभी राहील, पतीदेव गाढ झोपलेले, पेला भरून पाणी  घेतलं आणि त्याच्या छातीवर एकदाच ओतलं, 

"ये....अरे अरे........", तो खडबडून जागा झाला
राणी हसत हसत घरात पळून गेली, तो देखील मागे गेला.
स्वयंपाक गृहाच्या दाराशी पाठमोरी उभी राहून, हसत होती.

"कुठं पळतेस हा", तो घरात आला.

कमरेत हात घालत जवळ ओढलं अन पोटाचा चिमटा काढला,
"आ...धनी..नका..!", 

कळवळून त्याच्या तावडीतून सुटू पाहत होती, तिच्या कंबरेवर हाताचा विळखा घट्ट करत, कपाळावर गोड चुंबन घेत आपल्या मिठीत सामावून घेतलं.

अनपेक्षित घाव (भाग ३)

Image Credits 

unsplash-logoJan Tinneberg

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या