अनपेक्षित घाव (भाग ३) Anpekshit Ghav Part 3अनपेक्षित घाव (भाग २)

"उद्या सत्कार होणार, चांगलं कापड घाला बर का!"

"व्हय! मुडदा पडला तू अन सत्कार माझा?"

"तूच घे की ते बक्षीस"

"पेपरात तुमचं नाव आलंय, सर्व गावाला तुमचा अभिमान हाय, आणि बक्षीस तुम्हांसनी मिळालं म्हणजे मला बी मिळाल,तुम्ही पळत आलात त्याच्या मागं अन म्यां त्याला मारलं मग ते बक्षीस दोघांचं बी हाय"

"लय डेंजर हायेस तू, चोरांना काय मारतेस, नवऱ्याच तोंड काय गप्प करतेस", तो मिश्किल पणे म्हणाला

"व्हय का?",  रागीट डोळे करत तिने विचारलं

"व्हय..."

"आपल्या साठी जे चांगलं तेच सांगते, आणि तुमचं तोंड कधी बंद केलं म्या"

"काल राच्याला...."

"चला जावा तिकडं, लय काम आहेत मला, लग्गेच लाडात आला की राव", खोटा राग दाखवत, बडबडत तिथून निघून गेली.

आज्या डोकं खाजवत आपल्या बायकोच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहत राहिला, आणि कोणत्या तरी विचारात बुडून गेला.


तालुका पर्यंत बातमी पोचली होती की आज्यानेच चोराला मारलं होत, शासनाने घोषणा देखील केली होती, फोटो देखील काही पत्रकार काढून घेऊन गेले होते, अश्यात जर मी मारलं अशी वार्ता पसरली तर सगळीकडे संभ्रम होईल आणि साहेब बक्षीस काढून घेतील याचीही भीती होती.

बक्षीस मिळालं की सर्व कर्ज फिटनार आणि मग नव्याने जोमाने कामाला लागता येणार होत. खूप विचार करून तिने आज्याला सांगितलं होत की जे मिळतंय, जस मिळतंय तस घेण्यातच आपलं भलं आहे. त्यालाही ते कुठं तरी पटलं होत. आपला पती जिता आहे आणि त्याचा राग नाहीय आपल्यावर त्यामुळे तिला जे समाधान मिळालं होत, त्या तुलनेत सत्कार आणि बक्षिस किरकोलच होत.

सकाळी 10 लाच आज्या आणि मधुराणी, दोघांना गावच्या शाळेच्या मैदानात नेण्यात आलं, गावातली पुरूष, बायका आणि लहान पोर सुद्धा तिथे जमली होती. काही मिनिटांनी 4 गाड्यांचा छोटा ताफा गावात आला.


"साहेब आलं...साहेब आलं..!", कोणीतरी बोंब दिली.सर्वांच्या माना मैदानात येणाऱ्या गाड्याकडे वळल्या. गाड्यांचा ताफा थांबला, कोट घातलेले साहेब गाडीतून उतरले त्यांच्या मागे 4-5 सर्व गाड्यातून उतरले त्या मध्ये सदू शेठही होते, सर्व व्यासपीठावर आले. व्यासपीठ कसलं एक टेबल आणि 5-6 खुर्च्या होत्या आणि mic and speaker system लावून ठेवला होता.शुभ्र कपडा टेबलावर टाकून, फुलांनी सजवला होता.

साहेब मंडळी खुच्यांवर बसली, सदुशेठने पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं स्वागत केलं आणि लग्गेचच साहेबांनी mic हातात घेऊन भाषण करायला लागले.सर्व मान्यवरांचे आभार प्रकट केल्यावर व्यसपीठा शेजारीच उभ्या असलेल्या आज्या आपल्या जवळ बोलवलं. पाठीवर शाबासकी देत त्याचा हात हातात घेतला अन परत बोलू लागले, आज्या मूळ कुख्यात गुंड मारला गेला, या गावातच नाही तर आजू बाजूच्या सर्व गावात त्याने त्रास दिला होता, पण आपल्या या पेहलवानान त्याचा खात्मा केला. त्यामुळं त्याला शाबासकी म्हणून शासनाने 10 हजार रुपये बक्षीस देऊ केलं आहे.

"टाळ्यांच्या वर्षावात सर्वांनी आज्याच अभिनंद केलं, साहेबांनी फुलांचा गुच्छ, एक पिशवी आणि Cheque असलेले एक लिफाफा आज्याच्या हातात देऊ केला.

आज्या साहेबांच्या पाया पडला तसेच सदूशेठ च्या देखील पाया पडला. त्या नंतर क्षणाचाही विलंब न करता साहेब गाडीत बसले आणि निघून गेले.

गावकरी आज्याजवळ घोळका करून त्याची तारीफ करीत होते.
आज्या खूप आनंदात होता आणि ते पाहून राणी ला आपले अश्रू अनावर झाले.

गावकऱ्यांनी आज्याला उचलून त्याची गावभर मिरवणूक काढण्यात आली. आज्याही उत्साहाने त्यात सहभागी झाला. असं कौतुक पूर्ण आयुष्यात कधीच झाले नव्हते. आज्या आता गावचा हिरो झाला. गावात फिरून झाल्यावर दुपरच्याला दोघे पण घरी आले. काही तरी गोड करावं लागणार म्हणून आदल्या दिवशीच सर्व सामान आणून ठेवलं होतं.

"बसा, म्या आलीच", पाण्याचा तांब्या त्याच्या हातात देत ती चुली घरात शिरली.
 लग्गेच गरमा गरम शिरा बनवून, आपल्या पेहलवानाच्या पुढ्यात बसली.
"आज चा दिस गोड खाऊया, हे घ्या "
"वाह ! शिरा लय मस्त  झालाय."


शिरा संपल्यावर आज्याने तिच्या मांडीवर डोकं टेकवलं, दोघेही शांत एकमेकांकडे पाहत होते.

"जास्त इचार नगा करुसा, जे आपल्या हातात आहे तेच आजवर करत आलो आहोत आणि पुढेहि करत राहू. आपलं नशीब दे देईल त्याची चिंता सोडून, जोमाने नवीन सुरुवात करू", असं म्हणत त्याच्या डोक्यावरून हात  फिरवत राहिली त्यामुळे आज्याला गाढ झोप लागली.

आई वडिलांच्या जाण्याने उदास असणाऱ्या आज्याला नवीन उत्साह मिळाला होता. आपल्या पतीचं कौतुक आणि कर्ज मुक्त होऊ त्यामुळे राणीला देखील समाधान लाभलं होत.

एका अनपेक्षीत, भयंकर गूढ घटनेने दोघांच्या जीवनात कमालीचा बदल आला होता. एक घाव आज्याला बेशुद्ध करतो आणि त्याची पूर्ण परिस्तिथी  बदलून टाकतो.

अनेकांना ठार मारून, लुटणाऱ्या क्रूर चोराशी एका नव-विवाहितेने  कसा काय सामना केला? एवढच नाही तर त्याला ठार देखील केलं. तिच्यात इतकी ऊर्जा आली कुठून?

एवढ सगळं होऊन देखील आपल्या पतीने तिला माफ केलं, तरी त्या रात्री अनेक गुढ  गोष्टी घडल्या होत्या. तो एकच चोर त्याच घरात का शिरला? एवढ्या छोट्या घरात शिरून त्याला काय मिळणार होत ?

गावात आग लागली तेव्हा, सर्वांना कळलं चोर आले आहेत, मग ती आग कोणी लावली? चोर तर आग लावणार नाहीत, आणि लावली तरी चोरी झाल्यावर लावतील. कोणी आग लावली याचा काही पत्ता नव्हता, जो कोणी अंदाज लावत होता की चोरांनीच आग लावली.

एका रात्रीत ज्या घटनेमुळे तिच्या गरीब कुटूंबाचा आयुष्य बदललं होत, जर पुढे जाऊन अजून अजूनही भयंकर काही घडनार नाही ना? आज्यावर कोणतं संकट तर येणार नाही ना ?

ते काहीही असो पण त्या रात्रीचा अनपेक्षित घाव नक्कीच आनंद घेऊन आला होता.आपल्या देखील आयुष्यात अश्या अनेक घटना, असे बरेच घाव असतील ज्या मुळे आयुष्याला एक नवं वळण आलं असेल. तुम्ही तुमच्या कथा आम्हास पाठवू शकता. त्या साठी  Click  करा.


Image  Credit

unsplash-logoJay Chotalia

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या