डॉक्टर प्रियंका (Dr.Priyanka)


तुझी माझी भेट कधी होईल अस वाटल ही नव्हत पण तुझा जळालेला देह आणि सुंदर फोटो  मला खूप यातना देऊन गेला आणि म्हणून तुझ्या साठी चार ओळी लिहितेय खरतर हे लिहिण्याच्या मी लायक ही नसावी कारण आमच्या पैकी तुला कोणीच न्याय हा नाही देऊ शकत त्याबद्दल आताच माफी मागते मी.

तू तर गेलीस पण 

उरलेले आम्ही मात्र फक्त चार दिवस बोलत राहू
तुझा स्टेटस फक्त चोवीस तास बिनकामाचा ठेवत राहू
तुझा बलात्कार एक टीआरपी म्हणून गुणगुणत राहू
आणि सतत तुझ्या आत्म्याला ही धगधगती झळ देत राहू

आणि मग त्याच सध्या वापरात न येणाऱ्या मेणबत्त्या आम्ही हाती घेऊ
मग तुझ्यासाठी आम्ही आंधळ्या न्याय व्यवस्थेत
फक्त तुझ्यासाठी रांगडा न्याय तो मागत राहू
तुझ्यासाठी निदर्शने करू
आणि तुला खोटी श्रद्धांजली वाहू

त्यात तशी  चूक तरी कोणाची नक्की? 

आमची फक्त तेवढीच चालते
लोकल मधल्या अर्थहीन जागेसाठी
सभ्य नेत्या गोत्यांच्या प्रचारासाठी
केक कापताना तो थोबडवर फासण्यासाठी
बिनकामाचे मेमे स बनवण्यासाठी
जातीय वादीचे राजकारण करण्यासाठी
आणि चार चौघांच्या पार्ट्या मधे दारू ढोसून राडे करण्यासाठी


मला तू माफ कर
कारण मी एकही मेणबत्ती लावणार नाही
तुझा स्टेटस देखील ठेवणार नाही
कारण मला सुद्धा आता खूप असुरक्षित भासतेय
सोबत सर्व असताना सुधा अंधाराला मन भीते य
माचिस हाती घेताना सुधा अतिशय भय वाटतेय

तू तर गेलीस पण 

आम्ही कुठे कमी पडतोय
तुला खरा  न्याय नाही मिळणार ह्यानेच मन निःशब्द होतेय
आणि म्हणून ह्याबद्दल तुला कवटाळून मिठी मारावी वाटतेय
कारण आम्ही ह्या महान भारत देशात कायदा आणि सुव्यवस्था नाही आणू शकत
आम्ही दादा काका मामा आपा नाना ह्या सर्वांसाठी काहीही करू शकतो
त्यांचे कपडे ही धुवू शकतो

मात्र तुझ्यासाठी न्याय मागण्यासाठी नाही एकत्र येऊ शकत


ह्याबद्दल खूप खंत आहे आणि दुःख सुद्धा
प्रियंका मला मनापासून माफ कर
प्रियंका तुझीच एक अनोळखी मैत्रीण
एक असुरक्षित युवती
सोनल

image credits unsplash-logoVelizar Ivanov

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या