असामान्य अवलिया - डॉ. श्रीराम लागूअसामान्य  अवलिया
 डॉ. श्रीराम लागू

लहान असताना मी प्रथमच पिंजरा  चित्रपट पाहत होते. माझं लहान वय आणि डोकं काहीतरी वेगळंच विचार करत होत त्याबद्दल कारण संपूर्ण चित्रपट संपून सुद्धा पिंजऱ्यात अडकलेल्या नायक किंवा नायिकेला मी पहिलाच नव्हतं. मला वाटलं कि दोघांपैकी कोणीतरी एक पिंजऱ्यात नक्की अडकेल असं. पण असं काहीच झालं नव्हतं. 

तोच चित्रपट मी थोडी किशोरवयात आल्यावर पुन्हा पाहिला तेव्हा मला खऱ्या अर्थाने पिंजरा कळला. डॉ श्रीराम लागू ह्यांचा बहारदार अभिनयाने नटलेला तो पिंजरा. आजही मला तितकाच प्रिय  आहे. एका सुसज्ज व सुशिक्षित गुरुजीचे  पात्र खूपच सुंदर रंगवले होते त्यांनी. आडनाव लागू असल्याने स्व. रीमा लागू ह्यांचे पितामह आहेत कि काय? हाच प्रश्न मला नेहमी पडायचा. पण असे कोणतेच नाते त्या दोघंही अवलियांचे नव्हते.

आज सकाळी अचानक त्यांचा भावपूर्ण श्रद्धांजली चा फोटो पहिला आणि पुन्हा तो पिंजरा पुन्हा आठवला. आपल्या साध्या सरळ पण बहारदार अभिनयाने गेली कित्येक दशके रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या  डॉ. श्रीराम लागूं सारखा अवलिया पुन्हा लाभणे शक्य नाही. हिंदी, मराठी तसेच इतरही प्रादेशिक  भाषेत आपल्या अभिनयाने त्यांनी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. रंगभूमीवरील कवी कुसुमाग्रज लिखित नटसम्राट हे नाटक आजही लहानांपासून मोठ्यापर्यंत चे तितकेच प्रिय. 

"कुणी घर देता का घर? म्हणत आयुष्याच्या उर्वरित दिवसात भीक मागत फिरणारा तो नटसम्राट  नकळत डोळ्यात पाणी आणतो. आज तोच नटसम्राट हयात नाही ह्याचच दुःख होतंय. आपलं संपूर्ण आयुष्य कलेसाठी वाहिलेल्या ह्या सुजलाम सुफलाम अवलियाला आदरयुक्त श्रद्धांजली.
   
"देव हीच ह्या जगातील आद्य अंधश्रद्धा आहे आणि जोपर्यंत या अंधश्रद्धेला तुम्ही नकार देत नाहीत तोपर्यंत तुमच्या हातून अंधश्रद्धा निर्मूलन होणं शक्य नाही.
डॉ. श्रीराम लागू.Image Credits 

https://www.celebrityborn.com/admin/assets/images/people/S166WRxRagF4lywEmC9P_2016_11_15.jpg

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या