कविता (भाग २) - Kavita Part 2
कवितेचे ऑपरेशन यशस्वी झाले.काही दिवस डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेऊन तिला घरी सोडण्यात आले.कवितेची आई बहीण सर्वच तिची खूप काळजी घेऊ लागले होते.आपली सर्वात प्रिय व्यक्ती आज अंथरूण घेऊन बसली असल्याने तिचे बाबा सुधा हताश होते.

तिच्या बाबांच्या स्वभवतही फरक जाणवू लागला होता आणि हळूहळू ते सुधारू लागले होते.त्यांनी आता संपूर्ण घराची जवाबदारी स्वीकारली होती.

हळूहळू दिवस लोटत होते पण कविताला आता जरी अपंगत्व आले असले तरी घरीच बसणे जमणार नव्हते आणि म्हणून ती कुबळ्या चा सहारा घेत पुन्हा स्वतचा मार्ग शोधत निघाली होती.तसा तिच्या आईवडिलांचा व तसेच बहिणीचा ही त्याला विरोध होतच पण स्वाभिमान कणाकणात भरलेला असल्याने ती कोणाचं ऐकायला तयार नव्हती.

पूर्वी मशीन वर करत असलेलं काम तिला आता जमणार नव्हते कारण मशिनीला पायाच्या साहाय्याने दाब दिल्यावर भांड्यांना आकार मिळत होता.पण ओढवलेल्या प्रसंगाने तिच्या संपूर्ण आयुष्याचा आकार पार बदलून गेला होता.आता इतरांच्या जीवनाला आकार देणारी स्वतःच स्वतचं अस्तित्व शोधण्यात गर्क झाली

.खूप झटून सुद्धा तिला नोकरी मिळत नव्हती.कविता खूप निराश झाली होती तरीही तिने जगण्या प्रती कधी खंत व्यक्त केली नव्हती.तिला अजूनही कुठून तरी एक आशा होतीच की आज नाही तर उद्या नोकरी मिळेलच.

अशातच कविताच्या शेठने कविता साठी एक नोकरीचा प्रस्ताव आणला पण त्यात काही अटी होत्या.जशा की त्या नोकरीत तिला जास्त काही काम म्हणजे शारीरिक दृष्टया काही हालचाल करावी लागणार नव्हती.तिच्या शेठ ने पुण्याला एक नवा कारखाना भागीदारीत सुरू केला होता

.तेथे फक्त पैशाच्या आणि मालाच्या देखरेखीसाठी प्रामाणिक माणूस हवे होते.पण त्यासाठी तिला घर सोडावे लागणार होते.तिच्या आईचा कट्टर विरोध होता ह्या सर्वांसाठी पण कविताने खूप विचार करून तेथे रुजू होण्याचा निर्णय घेतला.

शेठ ने सुधा कविता माझ्या मुलीप्रमाणे आहे असा विश्वास देत तिला काहीही त्रास न होता ती तिचा नवा मार्ग शोधे ल अस म्हणत तिला चार पाच दिवसात तेथे जाण्यासाठी सुचवले.

आपली मुलगी आपल्या पासून दूर जाणार म्हणून आई तर चिंतेत होतीच तशी कविता आता वयात सुधा येत होती .तिचं लग्न वैगरे व्हावे एवढीच इच्छा होती पण आता तिला आलेल्या अपंगत्वामुळे तिच्या आईची ती इच्छा सुधा मावळत चालली होती.तिच्या बहिणीला चांगल शिकवून मोठं करावे हाच तिचं मानस होता.आणि म्हणून ती झटत होती.शेवटी तो दिवस उजाडला आणि कवितेची पुण्याला जायची वेळ आलीच.

आयुष्यात ज्या काही घडामोडी घडत असतात त्या मागे काहीतरी वेगळंचांगल दडलेले असते अशी तिची धारणा होती.आणि म्हणून स्वतःवर ओढवलेल्या वाईट प्रसंगाला सुधा ती अगदी आनंदाने सामोरी जात होती.तिला कसलीच तक्रार नव्हती.आणि हेच तीच्यातले वैशिष्ट्य होते

.ती खरच एक गुणी आणि संवेदनशील मुलगी होती.घरच्यांचं निरोप घेत ती निघाली होती तिच्या नव्या प्रवासाला नव्या अध्याय सुरू करायला.

घरच्यांपासून लांब राहण्याचा दुःख तर तिला सुधा होत पण परिस्थितीपुढे काही मार्ग नव्हता.अत्यंत भावूक आणि हळव्या शब्दाने तिने घरच्यांना निरोप दिला.आणि तिच्या शेठ ने गाडी सुरू केली.आपण महिन्याला पैसे पाठवत जाऊ आणि आपली काळजी नको अस ती ठासून सांगत होती.

अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या मुलीची गाडी डोळ्यांना दिसेनाशी होईपर्यत तिची आई उभीच होती.

घरी येऊन स्वतःच स्वतःच सांत्वन करत स्वतःशीच बोलत होती .मुलगी वयात येतेय तिला साजेसाच वर मिळाला तर किती बरं झालं असत.आता तर साजेसा सोडा पण बरा मुलगा ही तिला स्वीकारेल का?म्हणून स्वतःच स्वतःच सांत्वन करून घेत होती.कविता सारख्या मुलीला योग्य मुलगा मिळून तिचं चांगल व्हावं एवढीच तिची आशा होती.

पण खरच तिला साजेसा मुलगा मिळेल का?

कवितेला पुण्यात नक्की काय मिळेल?

तिचं आयुष्य खरच बदलून जाईल?

आईची इच्छा पूर्ण होईल?

की अजुन काही नव वळण तिच्या आयुष्यात येईल?नक्की काय होईल पुण्यात?


Image Credits

unsplash-logoDmitry Ratushny

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या