कविता (भाग ३) kavita part 3

कविता (भाग २) - Kavita Part 2

दुपारच्या सुमारास गाडी एका हॉटेल जवळ येऊन थांबली. शेठ न तिला जेवू घातले. कविता शेठ च्या खूप जवळची होती. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ती अत्यंत प्रामाणिक पणे आपलं काम करत होती व त्यामुळेच त्या दोघांमध्ये एक सदृढ नातं होत.जेवण वैगरे आटपून गाडी पुन्हा पुण्याच्या दिशेकडे कूच करू लागली.

पुण्याला पोचल्यावर एका औद्योगिक वसाहतीत गाडी येईन उभी राहिली.तिच्या शेठ ने तिची व्यवस्था मुद्दाम औद्योगिक वस्तीतच केली होती. कविता पायाने अधू झाली होती त्यामुळे आपल्या अनुपस्थित तिला कसलाही शारीरिक त्रास होतु नये म्ह्णून शेठ ने तिथेच कारखान्याशेजारी तिची राहण्याची व्यवस्थ आलेली होती. त्या औद्योगिक वसाहतीत घरापासून लांब राहणारे बरीच पुरुष मंडळी व स्रियांचाही सहभाग होता.  आज कविता त्यात नव्याने सहभागी होणारी कुमारिका होती.  

तिच्या खोलीची किल्ली तिच्या हाती देत शेठ ने तिला तू आत जाऊन बस मी कारखान्यात जाऊन काम पाहून येतो म्हणत तो तेथून निघाला. आजच्या प्रवासाने दमली असशील थोडा आराम कर मग संध्याकाळी तुला तुज काम समजावतो म्हणत शेठ तिथून निघाला. 

थोडीशी लंगडत कविता एका हाती सामान घेऊन रूम मध्ये आली. रूम मध्ये आल्यावर आपण  इथे व्यवस्थित पोचलोय म्हणून घरी कळवा हे शेठ ला सांगायचं पार विसरून गेली. कविता आपली नवी खोली न्याहाळत होती.एक छोटासा हॉल त्यातच एक पलंग त्याच्या शेजारी एक लाकडी मेज  भिंतींचा रंग काहीसा उडालेला तर हॉल लाच विभागून मागे छोट स्वयंपाक घर होत. 

मिळालेल्या गोष्टीत नेहमीच आनंद मानणारी कविता आजही तितकीच खुश होती. तिचे  आई-बाबा, बहिणी  सर्वाची तीला खूप आठवण येत होती.आपण घरी पोचल्याचा कळवळच नाही हे परत  तिला आठवले आणि ती चलबिचल झाली.आई उगाच चिंता करत बसेल ह्या विचाराने ती स्वस्थ बसू शकत नव्हती. आता शेठ कधी येतील ह्याकडे तीच लक्ष लागलं होत.  

तेवढ्यातच दारावर कोणीतरी थाप मारली. आईच्या काळजीने आणि दारावर पडलेल्या जोरदार थापेमुळे ती अजून घाबरली. आपल्या पायाने हळूहळू पुढे सरकत दाराजवळ येऊन दार उघडू लागली. शेठ आले असतील त्यांना अगोदर घरी कॉल करायला सांगते ह्या विचारात ती दार उघडू लागली. दार उघडताच क्षणी एक अनोळखी चेहरा तिच्या दृष्टीस पडला.गोऱ्या वर्णाचा,उंच ,चेहऱ्यावर काहीशी दाढी वाढलेली ,केस कुठेतरी कानापर्यंत आलेले ,डोळे मात्र तेवढे मोठे आणि पाणीदार असलेले अंगात अबोली रंगाचा शर्ट परिधान केलेला . 

कविता काही बोलणार ह्याआधीच मी  "सदाशिव ", त्याने आपली ओळख तिला करून दिली.मी इथला मुख्य पर्यवेक्षक असून नव्याने आलेल्या कामगारांची नोंद आदी करायचं काम करतो म्हणत त्याने आत येऊ का म्हणून विचारले. आणि दोघेही आत येऊन बसले. शेठजींनीच मला तुमच्या बद्दल सांगितले मी आता तिथूनच येतोय तुमचा फॉर्म वैगरे भरून त्याची नोंद करावी म्हणून आलो . 

तुमचं नाव? भित्र्या आवाजात "कविता"..  म्हणत सर्व माहिती ती त्याला देऊ लागली.शेवटी सही करण्यासाठी त्याने फॉर्म तिच्यापुढे धरला. थरथरत्या हाताने आपले नाव लिहीत तिने स्वाक्षरी केली. काही महत्त्वाचे कागद पत्र लवकरच  माझ्या कडे जमा करा  असं म्हणत तो जायला निघाला.तो दरवाजाच्या दिशेने जात असताना मधेच त्याला थांबवत ऐका  ना? असा जोरात सूर लावत त्याने मागे वळून पाहताच ती थांबली. तीला तिच्या वरच्या सुरात बोलण्याचे आपसूकच वाईट वाटले. तेव्हा तो उद्गारला "बोला ना ? काही काम होत का आणखी काही?.. आपला शब्द तोंडातच ठेवत ती हलक्या आवाजात बोलले तुमच्याकडे फोन आहे का ?मला घरी फोन करून आईला कळवायचे होते कि मी इथे सुखरूप पोचले असे. 

शेठ सुद्धा घाई गडबडीत निघून गेले आणि मला घरी सांगायची संधीच मिळाली नाही. ते कधी येतील काही सांगता येत नाही माझी आई तिथे माझ्यासाठी काळजी करत बसली असावी. त्याने लगेच आपल्या डाव्या खिशातून फोन काढत तिला फोन लावून दिला.    

फोन लावल्यावर आपण इथे पोचल्याचे शेठ ने याआधीच सांगितल्याचे तिला कळले. आणि तिच्यामनात  शेठ बद्दलचा आदर आणि प्रेम अजून वाढले.

आई फोन वरही सारख्या सूचना करत होती .कविता ने  स्वतःजवळ एक फोन बाळगावा हि तिच्या आईची इच्छा होती मात्र कविताला फोन हा प्रकारचं मान्य नव्हता . 

म्हणून तिने स्वतःजवळ एखादा फोन ठेवण्यास साफ नकार दिला होता, रोज आपण फोन मात्र करत जाऊ हि ग्वाही तिने दिली होती.

तुमचे जे काही पैसे झाले असतील आताच्या फोन चे ते मी तुम्हाला देईन असे म्हणत ती त्यांचे उपकार मानत होती. तीच हे साधं बोलणं त्याला खूपच आवडलं होत . तो काहीही न बोलता तिथून निघाला. सदाशिव ला एकच प्रश्न मनात सारखा डोकावत होता तो म्हणजे हि मुलगी एका नोकरी साठी इथे का आली होती ? आणि शेठ ने तिला इतकी मोठी जवाबदारी दिली होती. 

धड इंग्रजीत स्वतःची स्वाक्षरी हि न करता येणारी हि खरंच तितक्या योग्यतेची असावी का? असे असंख्य प्रश्न त्याच्या भोवती घिरट्या घालत होते. आणि मधेच त्याला कोणी तरी अडवले .Image credits 

unsplash-logoKristel Hayes

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या