कविता (kavita) Part 4Click here for all parts 
पुणेरी संध्याकाळ कवितेला नकोशी वाटत होती. तिच्या घरची सर्वच मंडळी तिला आठवत होती. पण परिस्थिती पुढे ती शमली होती. शेठ ची वाट बघत ती आता एका कोपऱ्यात जाऊन बसली होती, तितक्यात शेठच्या गाडीचा आवाज तिच्या कानी पडला. डोळ्यात दाटून आलेले पाणी अजून बाहेर येण्याआधीच तिने स्वतःला सावरत डोळे पुसले व चेहऱ्यावर एक स्मितहास्य ठेवत बसली. 

कविता मी उद्याच इथून निघणार आहे. सदाशिव इथला मुख्य आहे पोरगा खूप चांगला आहे .तुला  कुठे काही  अडल्यास त्याची मदत घेत राहा आणि स्वतःची काळजी घे स्वतःच्या पायाला जप आणि घरच्यांची चिंता नको कामाकडे लक्ष दे हळूहळू तुलाही होईल इथली सवय म्हणत शेठ तिथून निघाला. कारखाना वगैरे  दाखवून तिथलं काम समजावण्याचे काम सदाशिव करेल असं म्हणतं ते दुसऱ्या खोलीत गेले. संध्यकाळी जेवण आटपत प्रवासाने काहीश्या  दमलेल्या कवितेला झोप येत होती .

मनात सकारात्मक विचार ठेऊन आपण मन लावून काम करूयात आणि घरची परिस्थिती बदलूयात असं म्हणत चादर ओढून ती झोपी गेली.पुण्याची नवी पहाट कवितेला जणू खुणावत होती नव्या आशा देत होती आपली स्वप्ने साकार करण्यासाठी.  

कवितेने स्वतःच पटापट आवरत तयारी करून घेतली. आणि पुन्हा तिच्या दारावर कुणीतरी थाप मारली. कवितेने हलकेच दार उघडले तो काय कालचाच तो तरुण उभा होता अंगावरचे बदलेले शर्ट सोडले तर  त्याच्या राहणीमानात जराही बदल झालेला दिसत नव्हता .मॅडम मी तुम्हाला घ्यायला  आलोय काळ मला शेठने रात्री तुम्हाला दिलेली काम सांगितली आहेत तेच तुम्हाला समजवायचं आहे येताय ना सोबत  ?

हो आलेच.  कविता आता थोडी अडखळत चालत असल्याचे स्पष्ट त्याला दिसले व तेव्हा त्याला ती एका पायाने अपंग असल्याचेही साफ लक्षात आले. खोलीतील दिवे विझवून व गॅस बंद करून ती त्या पर्यवेक्षकासह कारखान्याच्या दिशेने निघाली. इथे कुठे जवळपास पी सी ओ असेल तर गाडी थांबवा मला माझ्या घरी फोन करायचा आहे.

सदाशिव तिच्या बोलण्यावर खळखळून हसला . ह्याने तिला खूप वाईट वाटले हा माणूस आपल्याला मदत करण्याऐवजी असा हा हा करून हसतो काय? तेव्हा तिने त्याला हसण्याचा जाब विचारला तेव्हा तो म्हणला मॅडम कुठल्या जमान्यात आहात तुम्ही? इथे कसले आलेत टेलिफोन बूथ आता तर अनलिमिटेड चा ४ जि जमाना आहे. अडाणी कवितेला तो म्हणत असलेले काहीही कळले नाही. त्याने आपला फोन तिला देत म्हणलं हा घ्या फोन आणि जितकं बोलायचं तितके बोला . 

सारखं सारखं आपल्या कामासाठी त्या माणसाकडे मदत मागणे तिला पसंत नव्हते. तिने स्पष्ट नकार देत आपण नंतर घरी फोन करेन असे  सांगितले. आणि सदाशीव ने हि जास्त सक्ती न करता आपला वेग वाढवत कारखान्याच्या दिशेने गाडी वळवली.
आपल्या पूर्वीच्या कारखान्यापेक्षा हा नवा कारखाना अजून मोठा आणि प्रशस्त होता . कारखान्यात येणाऱ्या जाणाऱ्या पैशाच्या हिशोब कडे लक्ष ठेवण्याचे महत्वाचे काम तिला दिले होते . सुरुवातीला काही गोष्टी अवघड आणि नव्याने वाटत असल्या तरी कविता निमूटपणे करत होती. कमी शिकलेली असली तरी ती स्वतःच डोकं वापरून हि कामात प्रगती आणत होती.हळूहळू कवितेच कामावर जॅम बसत होता. नव्या कामामुळे ती घरीही जास्त पैसे पाठवू शकत होती.

कवितेच्या बहिणीचे अर्धवट राहिलेले स्वप्न पुन्हा सत्यात उतरत होते.  तिच्या सध्या सोप्या कामाच्या पद्धतीने सदाशिव तिच्या कडे आकर्षित झाला होता. पण कवितेच्या मनात मात्र अशी कोणतीच भावना नव्हती. स्वतःच काम आणि ती एवढंच तीच समीकरण होत. कामाच्या निमित्ताने तसे दोघांचे फार जुळून यायचे मात्र कविता फक्त ते कामा पुरताच  मर्यादित ठेवू इच्छित होती.

एकदा सुट्टीच्या दिवशी मोठे धाडस करून सदाशिव ने कवितेला आपल्या सोबत बाहेर फिरायला यायचे आवाहन दिलॆ. मात्र भित्र्या कवितेला ते कधीच मान्य नव्हते व तिने स्पष्ट नकार दिला. सदाशिवला खूप वाईट वाटले. पण त्याने ते तिला कळू दिले नाही. त्याला कवितेची पुढची धोरणे जाणून घ्यायची होती तिला समजून घ्यायचे होते. पण कविता त्याला जरा सुद्धा संधी देऊ  देत नव्हती.

सदाशिव च्या मनात कवितेबद्दलचे प्रेम दिवसेंदिवस वाढत चालेले होते .तो तिची अति काळजी काळजी घेत होता आणि म्हणून कवितेला त्याचा राग येत होता. त्याच्या अशा वागण्याने ती त्रासली होती. आणि एकदिवस ती त्याला जाब विचारू लागली तेव्हा मला तू खूप आवडतेस तू माझ्याशी लग्न करशील का? असं तिला सदाशिव ने विचारलं तेव्हा कवितेला मोठा धक्का बसला आणि ती काहीही न म्हणता तेथून निघाली. 

आपल्या खोलीत एकटीच येऊन बसल्यावर ती विचार करू लागली आपण तर इथे कामासाठी आलोय आणि हे काय मधेच व तसेच शेठ जिचा आपल्यावर इतका विश्वास आहे जर त्याला आपण होकार दिला तर शेठजींना धोका दिल्यागत होईल. आणि तसेच आपण ह्यासर्वाचा काडीमात्र विचारही केला नाही. तो माणूस कोण कुठला. आपल्याबद्दल काय जाणतो? त्याला काय माहित आपण कोण. भूतकाळात काय घडलाय आपल्यासोबत. ह्या एकंदरीत सर्व प्रश्नाच्या भडिमाराने ती जमिनीवर कोसळली. 


image credits 

unsplash-logoCathal Mac an Bheatha

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या