कविता (भाग १) - Kavita Part 1कविता तशी सात इयत्ता कशीबशी पास होत आलेली.सडपातळ गोऱ्या वर्णाची मुलगी.काहीशी अबोल घुमी घुमीच राहणारी. अंगावर पडेल ते काम करणारी साधी सरळ मुलगी.शिक्षण कमी असल्यामुळे तिला तशी नोकरी पण साधीच.

घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे इतर कला शिकण्याची इच्छा असून सुधा मन मारत जगत आलेली.पण तिला आयुष्या कडून कसली तक्रार नव्हती. तिला तिचं आयुष्य तितकंच प्रिय होत जितके तिचे आईबाबा आणि तिच्या इतर बहिणी.

कविताच्या आईला तीन मुली होत्या त्यात कविता सर्वात मोठी होती.तिच्या आईने मोठ्या कष्टाने लोकांची धुणी भांडी करून तीनही मुलींचा सांभाळ केला होता.

कविताच्या बाबांना मुलाची खूप हौस होती व त्यामुळे कवितेच्या आईला विरोध करून सुधा त्यांना तीन मुली झाल्या होत्या.आपल्या परिस्थितीनुरूप वागावे अशी कवितेच्या आईची शिकवण होती.पण तिचे बाबा काहीशे वेगळ्या आणि मोठ्या राहणीमानाचा विचारांचे होते.त्यामुळे घरात सतत वाद विवाद सुरू असायचे.अशात घरात वातावरण नेहमी नकारार्थी असायचे.तरीसुद्धा कविता आणि तिच्या बहिणी अजिबात कुठल्या वाईट संगतीत नव्हत्या.

शिक्षणात स्वारस्य नसल्याने व तसेच वडिलांचा पाठिंबा नसल्याने ती खूप कमी वयात नोकरीला लागली होती.घरापासून थोड्याच अंतरावर एका उच्च गृहस्थाचे दोन कारखाने होते .

कारखाने कसले तर अल्युमिनियम भांडी वाट्या चमचे ताटल्या पेले बनवायचे.तिथे कविता प्रेस वर दिवसाकाठी 200 रुपये दिवस प्रमाणे अगदी लहान वयात व कारखान्याच्या सुरुवातीलाच सर्वात पहिली लागलेली बाल कामगार.आता ही बालकामगार मोठी झाली होती तशी पण तिच्या शेठ साठी ती अजूनही प्रामाणिक कविताच होती.

कविता कावितेप्रमाने होती कोणालाही आपल्या खास शैली ने आवडणारी प्रसन्न करणारी .परिस्थितीमुळे तिच्यावर खूप जवाबदारी पडली होती.

तिच्या मधल्या बहिणीने पण शिक्षण दहावीपर्यंत करत घरीच शिकवण्या सुरू केल्या होत्या.पण आपली धाकटी बहीण खूप हुशार आहे हे जाणून तिने तिला चांगल शिकवण्याचा निर्धार केला होता.

कविता त्या कारखा न्या साठी लकी असल्याचं तिच्या बॉस च म्हणणं होत व ते सुद्धा सगळ्यात जुनी कामगार म्हणून कधी भासल्यास आर्थिक पाठबळ सुधा पुरवत होते.

अशाच एक दिवशी सकाळी आवरून कविता रोजच्या प्रमाणे कामावर निघून गेली.दिवाळी जवळ येत असल्यामुळे काम जरा जास्तच होत.हल्ली अधिक वेळ काम करावं लागतं होत.कारण आलेल्या अल्युमिनियम पणतीच्या मागण्या लवकर पूर्ण करायच्या होत्या.

नेहमीप्रमाणेच ती जाऊन आपल्या कामावर बसून गेली .हळूहळू इतर कामगार कामावर येत होत्या.सर्व सुरळीत सुरू असताना तिचा शेठ कामावर लक्ष देताना फिरत होता आणि सर्वांना हात चालवण्याचे आदेश देत होता.आणि अचानक कुठेतरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

तशी एकच खळबळ माजून जो तो सर्वत्र जीव वाचवण्यासाठी पळू लागले.आजूबाजूच्या लोकांना कळताच त्यांनीही शक्य तेवढे प्रयत्न केले पण अल्पशा पाण्याच्या फवारणी करून आग विझत नव्हती.

तळमजल्यावर लागलेली आग आता झपाट्याने वरच्या मजल्यावर पोचत होती.त्यामुळे लोकांची गोचिच झालेली बाहेर पडण्यासाठी.अशात जो तो जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावर वरून उड्या मारता होता.काही जण त्यातही जखमी होतच होते.

पण काही न केल्यापेक्षा करून जीव वाचवण्याचे समाधान त्यांना मिळाले.कविता मात्र भित्री तिच्यात कुठून आलीय इतकी हिम्मत ते पण उडी मारण्याची पण तिच्या शेठ ने तिला उडी मारण्याचे आवाहन केले पण ती सतत घाबरत होती.शेवटी आगीपासून बचावासाठी तिच्या शेठ ने स्वतः तिला ढकलून दिले.

अनपेक्षित रीतीने ढकलण्यात आल्याने तिच्या मनाची अजिबात तयारी ही नव्हती की परिस्थिती सांभाळणं सुधा तिच्या हातात नव्हत आणि एकाकी ती खालच्या मोठ्या दगडावर पडली.

कविता अशा पद्धतीने दगडावर आपटली की तिचा उजवा पाय जोरात त्या दगडावर आपटला गेला.आणि ती कळ वळू लागली.तितक्यात अग्निशमन सुधा आले आणि आग काही प्रमाणात विझवण्यात त्यांना यश आले.ह्या सर्वात शेठ चे खूप नुकसान झाले.

तरीसुद्धा मोठ्या मनाच्या शेठ ने जखमी झालेल्या सर्वांना आर्थिक मदत करून मोलाची मदत केली होती.

कविताला हॉस्पिटल मधे नेण्यात आले.

तेव्हा डॉक्टर ने तिच्या पायाची मुख्य ढोपाऱ्या कडील वाटी तुटल्याचे कळले व त्यामुळे ती ऑपरेशन नंतर सुधा कायमची अपंग असल्याचे डॉक्टर म्हणाले.ह्या सर्वामुळे कविताची आई आणि बहिणी पार तुटून गेल्या होत्या.आज कर्ती सवर्ती घरतली मुख्य मुलगी एका पायाने अधू होणार ह्या कल्पनेने तिच्या आईची झोप पार उडून गेली होती.


Image Credits unsplash-logoRicardo Gomez Angel

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या