अजिंक्य (lone survivor) Part 2आज सर्व group members भेटणार, facebook आणि twitter handles ना चांगला response मिळत आहे आणि youtube वर channel open करायचा देखील अंगेंडा आहे. 

खाण्यापिण्यासाठी शीतपेय आणि स्नॅक्स घेऊन ठरलेल्या ठिकाणी चालत जात होता.

आदल्या दिवशीच संसदेत एका खासदाराने twitter users ची यादी देऊन ते देशातील कायदा सुव्यवस्था बिघडवू पाहत आहेत आणि लोकांच्या भावना भडकवत आहेत असे विधान केल्याचा video एका group member ने त्याला पाठवला, त्यात आपल्या twitter account च देखील नाव असल्याचं कळलं.

आपण सरकारच्या धोरणांचा विरोध करत आहोत, त्यांना direct कोणतंही आव्हान देत नाही आहोत त्यामुळे जास्त काही नाही होणार, आपण आपल्या अंगेंडा वर काम करत राहूया असे त्याचे मत होते आणि तेच तो सगळ्या members ना सांगणार होता.

चालत चालत meeting च्या ठिकाणाजवळ पोचला.
समोरच माणसांची गर्दी आहे आणि काही तरी झालय हे लक्षात येताच गर्दी च्या बाजूने पुढे जात राहिला. 

"सोडा मला, मी काही नाही केलय"
"चल, सांगतो नंतर तू काय केलेस ते!"

पोलीस त्याच्याच सवंगड्यांना फरफटत गाडीत डांबत होते. 

"हे काय होतंय ?? मी काय करू? नाही हे कस शक्य आहे?"
पूर्ण पणे गोंघळून गेला, हात-पाय गळाले, अंगातलं त्राणच गेले.
खूप राग येत होता पण तो काहीही करू शकला नाही, तसच मुखबधिर होऊन ते पाहत राहिला.

अशी परिस्तिती येऊ शकते हे सर्वजण जाणून होते पण इतक्या लवकर आणि तेही अशी? क्रांती सुरू होण्याआधीच चिरडली गेली होती.

"ज्या प्रश्नांची उत्तरे ते लोकांना नाही देऊ शकत, तेच प्रश्न योग्य  आहेत आणि त्यामुळे आमच्या सारख्यांवर कारवाही होत आहे.
एक समाज म्हणून कोणताही विचार, कोणताही बदल हा समाजाने स्वीकारायचा किव्वा नाकारायचा असतो. सरकारला तो कितीही अयोग्य वाटत असला आणि त्याबद्दल ते काहीही करणार नसले तरी विचार स्वतंत्र वर वार करून लोकांना पकडून तुरुंगात

डांबून, अत्याचार करणं हे अतिशय वाईट आहे."

"news चॅनेल्स आणि वर्तमान पत्रे सरकारची तारीफ करणारी माध्यमे आहेत, लोकांना influence करण्यासाठी, त्यांना इतर देशाविरुद्ध भडकवण्यासाठीच उपयोगात आणलं गेलं. हेच कारण आहे की social मीडिया"

"10 दिवस झाले अजून कोणीही संपर्क केला नाहीय, ते जिवंत तरी आहेत का?"

हताश होऊन त्याने आपली राहती जागा बदलली पण जॉब आधीच्या ठिकाणीच करत होता. आपल्यालाही पोलीस कधीही पकडतील या भीतीने त्याची झोप उडाली. आधी आई-वडलांनी वाळीत टाकलं, घराबाहेर हाकलून दिल, मित्रच सहारा होते, तेही आता कुठे आहेत कुणास ठाऊक.

बँकमधले सर्व पैसे त्याने काढले आणि सर्व व्यवहार रोख करू लागला. तसेच मोबाईल च sim त्यास बदलायचं होत पण जर मित्रांना पोलिसांनी  सोडलं तर ते संपर्क कसा करतील ? म्हणून तो धोका त्याने पत्करला होता. 

एका सकाळी तो, कामावर जायला निघाला, मोबाइल ची रिंग वाजली, मित्राचा नंबर पाहून खुश झाला, लग्गेच फोन उचलला, 

"हॅलो...कुठे आहेस ?"
"त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत आता तुझी बारी आहे", समोरून रागाच्या स्वरात भारदस्त आवाज ऐकू आला.
"तू जे केलंय त्याची सजा मौत आहे, आणि लवकरच तुला ती आम्ही देऊ"

बस एवढे ऐकून त्याला खूप काही कळलं.यात फक्त पोलीसच नाही तर पूर्ण गुप्तचर संघटना कार्यवत आहे.

त्याला पुढे काहीही ऐकायचं नव्हतं, कॉल बंद करून मोबाइल तोडून त्यातलं sim देखील तोडलं, पटापट बॅग मध्ये पैसे, काही कपडे भरले आणि त्याने बोर्डर जवळ जाणाऱ्या गावची बस पकडली. देशात राहिलो तर पकडले जाऊ, आणि सीमेवर जर काही लाच देऊन तिथुन निसटता आलं तर प्राण देखील वाचतील.

"हे सर्व संसदेत आपल्या twitter account च नाव आल्यामुळे झालंय, सरकार मध्ये काही पॉवरफुल लोक आहेत त्यांना आम्ही नको आहोत, ज्या देशाची स्थापनाच रीलीजन आणि दुसऱ्या देशांच्या नरसंहारासाठी झाली आहे, त्यात सरकार विरोधी विचार मांडणे म्हणजेच मृत्यू!"

काही दिवसांनी सतत प्रवास करून तो सेमेजवळच्या गावात पोचला. पैसे होते पण गावात राहणं धोक्याचं होत कारण, देश आणि रिलीजन विरुद्ध मी बोललोय ते त्याला कळलं तर तेच मला ठार मारतील, त्यामुळे तो गावात जास्त दिवस थांबला नाही, फिरत फिरत तो सीमेजवळच्या ओसाड प्रदेशाच्या दिशेने प्रवास करत राहिला.

देशाच्या सीमेलगदच राहणं त्याच्या साठी महत्व्याचं होत, कारण बाजूच्या देशात प्रवेश मिळाल्यास त्याचा मारले जाण्याचा धोका टळला असता.

कधी शेतातल्या झोपडीत, कधी पैसे देऊन कोणाच्या घरी तर कधी कोणाच्या अंगणात राहत तो पुढे पुढे जात राहिला, काही दिवसांनी एका ओसाड माळरानात जाऊन पोचला.
image credits unsplash-logoPaul Garaizar

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या