कविता (भाग 5) - Kavita Part 5
कविता - (kavita) Part 4

कविता नेहमीप्रमाणे सकाळी उठून कामावर जाण्यासाठी निघाली. कालंच्या संध्याकाळी जे काही झालं त्यामुळे तो 
"सदाशिव "आजपासून आपल्याशी बोलणार नाही असं तिला वाटले. पण तो रोजच्याप्रमाणे येऊन उभा राहिला .कवितेला त्या माणसा च नवलच वाटलं.काल  ह्याला आपण इतकं बोलून सुद्धा ह्या माणसाला  काहीच  वाईट वाटलं नाही? नक्की ह्याचा आपल्याप्रती काय हेतू असावा? ह्या विचारतच ती गर्क राहिली. आता फावल्या वेळेतही कवितेला "सदाशिव " आठवत होता. तीच मन त्याच्या वाहत्या विचारांनी थांबताच नव्हतं. 
हे आपणास काय होतंय?आपण का सारखा त्याचा विचार करतोय ? कवितेला इथे येऊन जवळजवळ सहा महिने झाले होते. एकदा आपण आपल्या गावी जाऊन सर्वाना भेटून यावं असं तिला वाटत होत. आणि त्वरित ती खोलीबाहेर आली.त्याच्या कडे जायचं कस ह्या विचारांनी ती पुन्हा ग्रासली. आणि एक हिम्मत एकवटून ती त्याच्या दरवाज्यापाशी गेली.

तिने दरवाज्यावर थाप मारली. अंगात पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलेली ,काळ्याभोर लांबलचक केसांची, नम्र स्वभावाची कविता त्यासमोर उभी राहिली होती.तीच ते रूप पाहून सदाशिव अजून तिच्या प्रेमात पडला पण तिच्या कडून कहीही उत्तर येणार नाही म्हणून तो हताश झाला होता. बोला कविता मॅडम काय काम काढलात ?

तुमच्या दाराशी आलेल्या मुलीला घरात माही घेणार का? असे म्हणत कवितेने त्याला एक स्मितहास्य दिल.त्याचा पाठपुरावा करत त्याने तिला आत बोलवून घेतले. "सदाशिव " च्या घरात अशा अति उपयोगाच्या वस्तू सोडल्या तर तसे काहीच नव्हतं . आपल्या आईवर कदाचित जास्त प्रेम करत असावा तो म्हणून आईचा फोटो भिंतिवर टांगलेला होता. 

सदाशिव स्वचतेच्या बाबतीतही अग्रेसर होता कारण एखाद्या पुरुष माणसाने घर इतकं साफ ठेवणं म्हणजे  खरंच कौतुकास्पद होत ते. बोला काय काम काढलात आपण? सर मला काही दिवसांची सुट्टी मिळाली असती  तर गावी जाऊन सर्वाना भेटून आले असते.

माझं काम तुम्ही सांभाळलं असत काही दिवसांसाठी  तर बर झालं असत म्हणत ती त्याच्याकडे पाहू लागली. काही वेळ विचार केल्यावर त्याने तिला ठीक आहे जा म्हणत संमती दर्शवली. कविता हि नकळत त्याच्या प्रेमात पडली होती. पण आपण अपंग ,फक्त सात इयत्ताच शिकलेली अशी घुमी त्याची खरंच  साथ निभावू शकतो का? 

तिला  काही कळत नव्हते.पण सदाशिव ला हि विसरणे तिला आता अशक्य झाले होते. आपल्या सोबत राहणार तिचा रोजचा सखा काही दिवस आपल्यापसून दूर जाणार ,तो आपल्याला दिसणार नाही ह्या चिंतेने ती ट्रस्ट झाली होती. पण तिला स्वतःहून कधीच पुढाकार घ्यायचा नव्हता.

दुसऱ्या दिवशी ती तेथून निघाली तेव्हा सकाळी तिला सोडण्यासाठी सदाशिव हजर झालेला पाहून तिचे त्याच्याबद्दल चे प्रेम दिवसेंगणिक वाढतच होते. काही दिवस आपल्याला सदाशिव शी भेटता येणार नाही ह्या विचाराने आता ती हि कावरीबावरी झाली होती. पण तीच घरी जाण हि आता तितकेच महत्वाचे होते. 

कवितेला ट्रेन मध्ये बसवताना त्यालाही भरून आले होते. लवकर ये मी वाट पाहिन, असं म्हणत जणू त्याने कवितेला कवेतच घेतल्याचं तिला जाणवलं. कविता फक्त आपली आहे आणि राहील हे आता सदाशिवला तिच्या डोळ्यातूनच कळलं. कळलेले भाव मात्र  तिच्याकडून वळत नव्हते हे हि तेवढच खरं.

कित्येक महिन्याने आपल्या काळजाचा तुकडा आपल्यासमोर पाहत तिची आई आणि सर्वच फार सुखावले. तिच्या त्या धाडसी निर्णयाचे आजुबाजुचेही कौतुक करत होते . पोरीने करून दाखवलं म्हणत सर्वच तिचे गुणगान गात  होते.आईच्या सहवासात कवितेचे दिवस चांगलेच जात होते. एकेदिवशी आईने तिच्यासमोर सहजच लग्नाचा प्रस्ताव मांडला. आणि तिला सदाशिव आठवला. आपल्या आयुष्यात अगोदरच कोणीतरी आला आहे हे आईला कसे सांगावे. 

ती स्वीकारेल का हि गोष्ट. तिला काहीच काळात नव्हते. तिच्या आईने एक स्थळ कवितेसाठी सुचवलं होत. ठरल्यानुसार ते कवितेला बघण्यासाठीही येणार होते. पण आपल्या पोरीच्या अपंगत्वाला झाकून ती हे सर्व करत होती. तिने समोरच्या मंडळीला कवितेच्या कमजोर बाजूबद्दल काहीही सांगितले नव्हते. ठरल्याप्रमाणे ती मंडळी आली कवितेचा बघण्याचा कार्यक्रम हि पार पडला. कविता कुठे तरी नाखूष होती. हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट होते. खूप दिवस सुट्टी झाली आपण जायला हवे असं म्हणत तिने एक सुस्कारा सोडला. आणि गाढ झोपली गेली.

सकाळ झाली आणि ती पुन्हा पुण्याच्या दिशेने जायला निघाली. तेव्हा तिला सोडायला तिचे आई बाबा आले होते. थोडे दिवस काम करून पुन्हा ये, मुलाकडच्यांना काम करणारी सुनबाई नको असं तिची आई स्पष्ट बोलाली. तेव्हा कवितेला तिच्या व्यक्ती स्वातंत्र्याची जाणीव झाली. आपल्या कुटुंबासाठी आपण काय काय केलं नाही. असं सरसकट कोणीही आपल्या आयुष्यात येऊन आपला स्वाभिमान कसाकाय हिरवी शकतो? तोच एक जोरदार भोंगा वाजला आणि गाडी सुरु झाली.

Image Credit 
unsplash-logoSasha Freemind

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या