अजिंक्य (lone survivor) Part 3


पहाटेला रोजचा alarm वाजला, उठल्यावर त्याने रोजच्या प्रमाणे हॉल ची खिडकी उघडली आणि बिल्डिंग खाली पाहू लागला, आज जास्त वर्दळ दिसली नाही.

"आज सुट्टी आहे काय? कोणीही बाहेर दिसत नाहीय? 
ही gate जवळ अनोळखी माणसे कोण आहेत?" 
त्या माणसांपैकी 2 जण पळत बिल्डिंग मध्ये शिरले.

"काही तरी झालंय का? police तर नसतील ? मला पकडायला .....?"

काही कळायच्या आतच, एक जोराचा स्फोट होतो, स्फोटाच्या तीव्रतेने तो खिडकीवर फेकला जातो, घरात धूर पसरतो,  

माणसांचे आवाज येऊ लागतात, तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो पण समोरच 2 माणसे हातात बंदूक घेऊन त्याच्या दिशेने येतात.

"नाही नाही....नाही......"
अंधाधुन गोळ्याचा  वर्षाव सुरु होतो, काही गोळ्या शहरीराला चाटून जातात  पण काही शरीर भेदून पार होतात.

देह जमिनीवर पडतो, डोळ्या समोर अंधारी येते आणि आणखी एक स्फोट होतो .   


गाढ झोपेतून तो दचकून उठतो, हडबडीत आजू बाजूला पाहतो, 

"स्वप्न...स्वप्न होत...."

माळरानात,  त्या इवल्याश्या झोपडीत तो तसाच पडून राहतो, स्वप्नामुळे त्याच्या अंगातले त्राणच गेले, मृत्यू समोर दिसत होता आणि तो कधी, कसा येईल काही ठाऊक नाही.मरणाची भीती होती पण आपल्या मतावरही तो ठाम होता. 

"मरण आलं तरी चालेल मी माझ्या तत्वांशी ठाम राहीन, मी जे प्रश्न विचारलेत त्यांची उत्तरे ना सरकार देऊ शकत ना रूढीवादी लोग देऊ शकत."

आपल्या देखील आयुष्यात काही गोष्टी असतात त्या आपण नाही पचवू शकत, त्या गोष्टी खूप त्रासही देत असतात पण त्या सोबत जगावं लागत, adjust करावं लागत. 

तो आयुष्याच्या अश्या वळणार होता की तिथे त्याला पुढे जाण्याचे अनेक सोपे मार्ग होते पण त्यानंतर तो स्वाभिमानाने जगू शकला नसता. त्याच सत्य त्याला मरणाहून जास्त प्रिय होत.  

"माझं सत्य मी जगेन, त्यासाठी मला देश सोडावा लागला तरी चालेल. पण या बुरसटलेल्या चाकोरी मध्ये मला नाही राहायचं.
माझ्या मरण्याने आता कोणाला काही फरक पडणार नाहीय, पण 
मी संघर्ष करत राहणार, माझी लढाई माझ्या अस्तित्वा सोबत माझ्या विचारांच्या अस्तित्वा ची देखील आहे, हा संघर्ष मला प्रिय झाला आहे."

10 दिवस झाले, अजूनही तो त्याच ओसाड माळरानात, इवल्याश्या झोपडीत राहत होता. माळरानात फिरणाऱ्या काही लोकांशी त्याच्या संपर्क आला होता, तो त्यांच्या कडून जेवण घेत असे. 

काही का असेना पण इथे आल्यापासून त्याला स्वतःबद्दल, आपल्या विचारांबद्दल आणि इतर गोष्टीबद्दल विचार करायला भरपूर वेळ मिळाला होता पण तरी इथून आपण दुसऱ्या देशात जाऊ शकतो ? आपण कसं  पुढे आपलं अस्तिव टिकवू शकतो ? असे अनेक प्रश्नही त्याला अधून मधून त्रास देत होते.     

"हा प्रदेश खूप स्वच्छंद आहे, सकाळचं कोवळं ऊन, अथांग पसरलेलं ओसाड माळरान, प्राणी-पक्षांची साथ, जवळच असणारी छोटी नदी आणि मी"

"शहरात मी एका कॉल सेंटर मध्ये काम करणारा worker, इंग्लिश उत्तम बोलणारा, माझ्या सारखे अनेक  आहेत, माझा दोष इतकाच की मी त्यांना प्रिय असलेल्या religion वर माझे विचार व्यक्त केले. पण यात मला माझी चूक कळत नाहीय, जर त्यांनी त्यांचा religion माझ्यावर थोपला नसता तर माझा तर्कशुद्ध पद्यतीने मांडलेल्या काही सोप्या पण अडचणी च्या गोष्टीं त्यांना माझ्या कडून ऐकायला मिळाल्या नसत्या."

"माझं मला जगू दिल असत, आणि त्यांचे बुरसटलेले विचार आणि पद्धती त्यांच्या कडेच ठेवल्या असत्या तर मला त्यांच्या बद्दल थोडा आदर वाटला असता, पण या देशात religion ही आत्म-शांती साठी नसून समाजात दाखवण्याची गोष्ट आहे"

"जा माझ्या मुलाला समजवा नाही ऐकलं तर फटके द्या अस स्वतः जाऊन गावगुंडांना सांगून आलेला बाप, आणि तू दृष्ट आहेस आणि मेलास तर माझ्या religion चा एक शत्रू कमी होइल अस म्हणणारी माझी आई, यांना कोणत्या पुस्तकांनी ही गोष्ट शिकवली असेल ?"

"माझे आई वडील शिकलेले देखील नाहीत, या अतिवादी गोष्टी कोठून कळल्या? माझे जन्मदाते च माझ्या जीवावर उठलेत तेही फक्त समाज काय म्हणेल या भीतीने तर अशी अतिवादी मानसिकता नवीन विचारांना, भावनांना आणि क्रियाशीलतेला नेहमी मारत राहणार आणि तेच त्यांचं प्रथम कार्य बनेल.


असा समाज, देशाच्या सर्वनाशासाठी कारणीभूत ठरेल आणि आजू बाजूचे देश त्याचा गैरफायदा घेतील"


"पुढे काय होईल माझं? कोणतीही वाट सापडत नाहीय! या अश्या  ओसाड माळरानात मी आयुष्यभर नाही राहू शकत, मला माझे विचार जगासमोर मांडायचे आहेत. मीही एक दिवस मरणार आहे पण एका समाधानाने मारायचय की मी सर्व जगाला माझे विचार सांगेल, त्या बुरसटलेल्या religion वर माझे काही प्रश्न आहेत, ते विचारेन"


"आज मी एकटा संघर्ष करतोय, माझ्या सोबत फक्त माझे विचार आहेत, आणि ते मी अनेक पुस्तके, research करून मला आत्मसात झाले आहेत, विचारांची लढाई विचारांनी लढायची धमक नाहीय या कायर समाजाची म्हणून माझ्या जीवावर उठलेत."

"बुरसटलेल्या विचाराच्या हे दरिद्री देशा, मी मरेपर्यंत तुमच्या विचारांशी लढेन आणि तुम्हाला तुमची योग्य जागा दखवेन...."Image Credit 

unsplash-logoOscar Keys

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या