कविता (भाग 6) - Kavita Part 6ट्रेन  दिसेनाशी होईपर्यंत आपल्या जाणाऱ्या मुलीला आई बघत होती. कविता तर सदाशिव च्या विचारात गर्क होती. आईने आणलेलं स्थळ तिला मुळीच आवडले नव्हते, त्यात लग्नानंतर फक्त घर सांभाळणं हे तिला अजिबात मान्य नव्हत. तरी ती काहीच बोलली नव्हती, अजून काही तासांनी  तिची ट्रेन स्टेशन वर आली, कारखान्यात जाण्यासाठीचा रिक्षात ती बसली. सदाशिव ला सामोरे कस जावं? त्याला आपल्या मनातलं कसे सांगावं? हीच तिची चलबिचल मनात सुरु होती. कारखान्यात गेल्यावर कळलं कि सदाशिव गेली आठ-नऊ दिवस कारखाण्यात आलाच नाही. त्याच काळात तिचे शेठ मात्र तिथे आले होते. दरम्यान त्यांना कवितेचं लग्न जुळल्याचे देखील कळले होते. कविता कुठेतरी उदास झाली होती आणि ते तिच्या शेठ ला सुद्धा जाणवलं, तेव्हा त्यांनी तिची समजूत काढत आयुष्यात पुढचा निर्णय घे म्हणत तीच सांत्वन केलं होत. 

तिचा सदाशिव वर जडलेला जीव मात्र टांगणीला लागला होता. कसबस काम संपवून ती संध्याकाळी तिच्या रूम वर आली होती. कुठे गेला असेल बरं तो ? असा कसा निघून गेला मला न सांगता? असे असंख्य प्रश्न तीच चिडचिड वाढवत होते.

नंतर ती स्वतः विचार करू लागली का तू त्याच्यासाठी एवढी झुरत आहेस? तुझं त्याच नातं काय?  त्यासाठी तू किती पात्र आहेस ? काय करावे तिला सुचेनासे झाले होते. आणि ह्यातच तिला झोप लागली.  

सकाळी उठून नेहमीप्रमाणे सार काही मनात ठेऊन कामावर जाण्यासाठी ती निघाली. कामात लक्ष काही लागत नव्हते आणि काम संपवायचे म्हणून ती काम करत होती. कुठूनतरी तो अचानक येईल असाच तिला वाटले पण तिच्या आशेवर मात्र पाणी फिरत होते. एक दिवस दोन दिवस असं म्हणता म्हणता आज आठ दिवस उलटून गेले तरी त्याचा काही थांगपत्ता लागला  नव्हता. 

एकेदिवशी आई बाबा तिला भेटण्यासाठी पुण्याला येऊन पोचले. आपल्या खोलीवर आलेले आई बाबा पाहून तीच हळवं मन अजून गहिवरून आलं. तिने घट्ट आईबाबांना मिठी मारली. तेव्हा तिच्या आईने तिची समजूत काढत तिला शांत केले व आता हि नोकरी करायची काही गरज नाही हे तीला सांगून आपल्या सोबत येण्यासाठी तिला सांगू लागले. 

शेठशी तुझ्याबद्दल आम्ही आधीच बोललो आहोत तर तुझंही चांगलं होताना त्यांना हि काही हरकत नाही असं म्हणतं त्यांनी तुझ्या लग्नासाठी आम्हाला आर्थिक मदत करायची शाश्वती हि दिली आहे. ह्यासर्वात तिला कोण काय बोलते ह्या कडे अजिबात लक्ष नव्हते तिला जे हवं होत ते तिच्याकडे नव्हतं आणि म्हणून ती आतून खूप गहिवरून गेली होती.

घरी आल्यावर लग्नाची गडबड सुरु होती. लग्नानंतर आपण धड नोकरी हि करू शकत नसल्याची खंत तिच्या मनी  होती. तरीसुद्धा सारं काही  व्यवस्थित सुरु होत.  दुसऱ्या दिवशी कोणीतरी एक वार्ता घेऊन आले आणि कवितेच्या आईला रडू कोसळले ते म्हणजे मुलाला मुलगी पसंत नाही आणि तसेच मुलीकडच्यांनी दगा देत मुलीच्या अपंगत्वाबद्दल काहीच सांगितले नव्हते. 

कवितेच्या बाबतीत मिळालेला हा नकार तिची आई अजिबात पचवू शकले नव्हते. खूप विनवण्या करून झाल्या माफी मागून झाली मात्र तिथून काहीच प्रतिसाद मिळल नाही. आणि लग्नाच्या घरात एक दुःखद वातावरण तयार झाले होते. संपूर्ण रात्र रडत काढून पहाटेच सर्वजण झोपेत असताना कविता घराबाहेर दूरवर निघून कुठेतरी गेली.

नंतर सर्वाना हे काळातच तिचा शोध घेण्यासाठी धावाधाव सुरु  झाली . संपूर्ण गाव शोधले तरीही तिचा थांगपत्ता लागला नव्हता . आणि तेवढ्यातच एक फोन वाजला आणि ताबडतोप हॉस्पिटल ला निघून या म्हणत शेठ ने फोन ठेवला . कवितेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता मात्र  सदाशिव ने तिला वाचवले होते . शेठ ने सदाशिव शी संपर्क साधला तेव्हा त्याला कवितेच्या लग्नाविषयी हलकेच खबर लागली होती व तो लग्नात उपस्थित राहण्यासाठी आदल्या दिवशीच येत होता. आणि तेव्हाच पहाटे गाडी खाली जीव देण्यासाठी गेलेल्या कवितेला सदाशिव ने ओढले होते मात्र धसमुसळे पणात ती उलटी पडून डोक्याला मार बसला होता आणि ती बेशुद्ध पडली होती.

सर्वजण हॉस्पिटल मध्ये कविता डोळे कधी उघडेल ह्याची वाट पाहत थांबले होते. शेठ सदाशिवची ओळख तिच्या आई बाबाना करवून देत असताना कवितेने हलकेच डोळे उघडले आणि तिला समोर तोच मोठ्या पाणीदार डोळ्यांचा ,केस व्यवस्थित कापलेला, सुंदर तरुण उभा दिसत होता. त्याला पाहून ती  खूप सुखावून गेले होते. आपण ज्याला शोधतोय तो असा आपल्यासमोर उभा असल्याचं तिला नवल वाटलं. कवितेने त्यावर प्रश्नाचा भडीमार करण्याआधीच त्याने तिला पडलेले पेच नंतर समजावून सांगत म्हणून त्या सर्वांसमोर पुन्हा लग्नाचि मागणी घातली. आणि तिथे उपस्थित सर्वच जणांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते.

आयुष्यात जे काही होत चांगलं वाईट ते आपल्या चांगल्यासाठीच होत असत असा विचार करत कविता तशीच पहुडलेल्या खाटेवरून फक्त तिच्या "सदाशिव " ला प्रेमाने न्याहाळत होती. 


Image Credit  - https://unsplash.com/photos/UOwvwZ9Dy6w

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या