गोधडी (भाग २) Godhadi Part 2

शेठ कडून मिळालेल्या पैशाने आजी संसार चालवत होती. मुलगा आणि सुन गेल्याच दुःख मनाच्या खोल कप्प्यात ठेवून तिने नातवासाठी जगण्याचा निर्धार केला होता व त्याप्रमाणे ती जगत होती. 

आजीने जयेशचा इतका छान सांभाळ केला होता की त्याला सुरुवातीचे काही दिवस सोडले तर आई बाबांची उणीव भासत नव्हती. आजीच्या कुशीत झोपल्याशिवाय त्याला एकही रात्र झोप लागत नसे. इतकं घट्ट नात त्या दोघांमध्ये तयार झाले होते. मिळालेल्या पैशातून जरी खर्च सुरू असला तरी पैसा हा जास्त काळ न टिकणारी गोष्ट नसल्याने आजी घरच्या घरीच गोधड्या शिवायचे काम करून काही रक्कम भविष्यासाठी तरतूद करून ठेवत होती. 

जयेश परत येईपर्यंत आपण पुर्णत्वास आलेल्या गोधडीचे शेवटचे टाके मारून घ्यावें म्हणून ती पुन्हा बसली आणि नेहमीप्रमाणे तिच्या डोक्यात  विचारचक्र घिरट्या घालू लागले. नातवाच्या पुढील शिक्षणासाठी कायकरायचे गोधड्या शिवून फक्त खायचं प्यायचं सुटत पण साठवून ठेवलेलं अस आता काहीच नाही.

गरीब विद्यार्थांसाठी काही संस्था मदत करतील पण आपल्या नातवाला प्राध्यापक बनायचं आहे, त्यासाठी कसा खटाटोप करायचा असे विचारचक्र सुरू असताना पटकन सुई तिच्या बोटाला लागली आणि तिने हात तोंडात घातला. पुरे झालं ह्या पोराचा राग ती स्वताशीच पुटपुटत बाहेर आली आणि मोडकी छत्री हातात घेत घराबाहेर पडली. पाऊस जोराचा सुरू होताच.

 साहिलचे बाबा अहमद मियाँ ने आजीला पाहताच आत येण्याचा आग्रह केला. 

क्या हुआ आजी ? साहिल को जर बुलाओ जयेश कबसे इतनी बारीश मे खाडी की ओर गया है |  आजी बोलली.
आजीचा आवाज ऐकून जयेश त्वरित उठला.

आजी काय झालं ?

मराठी शाळेत शिकत असल्याने साहिल ला उत्तम मराठी येत होते. आजी तो अजून आला नाही का ग? नाही रे, तू जरा जातोस का? आजी ने आर्जव केलं. हम उसको लेके आते है आप तबतक इधर आराम से बैठे.

रुकसार उठ, जयेशकी आजी आइ है बाहर। मै और साहिल उसको लेकरं आता हु । अस म्हणत खुंटीवर टांगलेला शर्ट घालत अहमद मिया ने तिला झोपेतून उठवलं.

गावापासून खाडी पर्यंत 2 किमी एवढे अंतर होते. इतक्या भर पावसात ते बाप लेक ह्याला परत आणायला निघाले.

क्या है रे उसको जब देखो तब खुदकी मनमानी करता है, अब सुबेह से बाहर है वो आजी के बारे मे भी नही सोचता है क्या?

अहमद मियाँ साहिल ला विचारत होते आणि त्यांच्या बोलण्यातकमालीचा राग होता
पण साहिल त्याचा जिगरी मित्र असल्याने त्याने त्याचीच बाजू घेत त्याच्या अब्बाला समजावत विषय तेथेच थांबवला आणि पुढील रस्ता चालू लागले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या