गोधडी (भाग १) ( Godhadi part 1)जयेश ने आपला निकाल मित्राच्या मोबाइल वर पाहिला आणि सरळ घरच्या दिशेकडे न जाता तो खाडीच्या दिशेने एकटाच जाऊ लागला तेव्हा त्याचा मित्र साहिल त्याला थांबवू लागला आणि घराकडे चल म्हणून त्याच्याशी बोलू लागला. धो धो पडणार पाऊस आणि कमालीचा गारवा ह्याने मोकळ्या रस्त्यावर तर अंग शहारत होते  दात थंडीने कडकडत असताना जयेश ने त्याला हुसकावून लावले व आपण  खाडीवर जात आहोत म्हणत पुढे चाल धरली.

साहिल खूपच भित्रा आणि चंचल मुलगा होता. डोक्यावर पडणारी वीज पाहून तर तो आधीच घाबरला आणि आपली छत्री सावरत तिथून घराच्या दिशेकडे वळला.आज त्यांचा 12 वी चा निकाल लागला होता. साहिल ला 62℅तर जयेश ला 60%पडले होते. दोघेही कला क्षेत्रात पदवी घेऊन उत्तीर्ण झाले होते.

घराकडे येताना साहिल च्या आईने घरातूनच त्याला जोराची हाक मारली पण जयेश खाडीवर गेला आहे हे त्याच्या आजीला सांगायचं म्हणून तो आपल्या अम्मीला कुठलाही प्रतिसाद न देता दोन घर सोडून बाजूच्या घरासमोर जाऊन उभा राहिला. आतून काहीतरी कुरकुरीत  तळल्याचा वास साहिल ची भूक वाढवत होता.

घराचे दार अर्धवट उघडे होते.आजी .तेवढ्यात आतून आवाज आला ये ये आत ये तुझ्या आवडीची भजी बनवली आहे.आजी मी जयेश नाही साहिल.कमरेला हात पुसत आजी दरवाज्या पाशी आली मग  काय झालं जयेश काय साहिल काय आहे त तर माझेच ना तुम्ही असे म्हणतं आजी पुन्हा चुली पाशी गेली आणि चुलीवर च्या कढईतून कांदाभजी काढत साहिल पुढे ताट धरला आणि जयु ची विचारणा केली .तो वेडा खाडी कडे गेला मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याने माझं ऐकलं नाही.
तुला तो काही बोलला होता का आजी??

भजी चा एक घास खात खात त्याने  आजीला विचारले तेव्हा आजीने डोळ्यावरच्या चष्मा काढत साहिल ला काही म्हणणार इतक्यात त्याची अम्मी पुन्हा त्याला आवाज देऊ लागली पाऊस इतका जबरदस्त होता की आवाज नीट ऐकू येत नव्हता मात्र मगाशी अम्मीला टळून आता पुन्हां तिला टाळणंम्हणजे अम्मीचा ओरडा खाणं हे साहिल ला चांगले माहीत होते अर्धवट खाल्लेला भाजीचा ताट त्याने आजीच्या हाती सोपव ला आणि तो घरी निघाला.

इथे आजी ने गरमागरम भजी चा बेत केला असताना खाडीजवल गेलेल्या नातवाची ओढ तिला सतावत होती. सकाळी झालेल्या बाचाबाचीने तो आपल्या वर रागावला असावा असेच आजीला वाटत होते.आजीने चुळीमधली लाकड कशीबशी विझवली. व जयेश ची वाट पाहत पुन्हा गोधडी शिवायला बसली. 

जमना बाई एकेकाळी  मुलगा आणि सुनेच्या मजुरीवर आपल्या नातवाला सांभाळत मुलाच्या  संसारात सुखाने वावरणारी. पण  त्या नियतीच काही भलतच आखून ठेवलेलं . तो दिवस तिच्या आयुष्यातला काळा दिवस ज्या दिवशी तिचा मुलगा आणि सून दोघेही एकाच वेळी त्या इमारतीच्या लिफ्ट मधून मालं वाहताना त्या लिफ्ट चा अपघात होऊन दोघेही गंभीर जखमी झाले ले. काही दिवस जगले ते मात्र एका नंतर एक दोघं सुधा ७वर्षाच्या पोराला आजीच्या पदरात टाकून गेले. आजी ने खूप काबाड कष्ट करून नातवाला वाढवला. शेठ तसा बरा होता दोघांचे मिळून ४० ४०प्रमाणे ८०हजार देऊन गेला. 

 आजी त्याला देवागत मानत होती मात्र तिला ह्यातील राजकारण कुठे माहीत होत की त्याने बांधकामासाठी वापरलेली लिफ्ट ही निम्न दर्जाची होती व तसेच कोणी केस वैगरे करू नये म्हणून तो बिल्डर पैसे देऊन सर्वांना शांत करत होता. पण आजी तशी भोळी होती आणि तिला पैशाची गरज सुधा असल्याने तिने गपचुप ते पैसे घेतले होते. 
तिच्याजवळ सुद्धा कोणता पर्याय नव्हता. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या