अजिंक्य (lone survivor) Part 4


नेहमी सारखी सुंदर संध्याकाळ होती, तांबूस आकाशी स्वर्ग, उल्हासित हिरवे माळरान, गुलाबी थंडी आणि पक्ष्यांचा किलबिलाट. 

नेहमी सारखा टेहळत तो, जाळण्यासाठीची लाकडं शोधत जवळच्या छोट्या जंगलात फिरत होता. पटकन जळणारी सुकी बारीक लाकडं जमा झाली होती पण अधिक काळ आग पेटत राहावी या साठी मोठं लाकूड हवं होत त्यासाठी तो जंगलात अधिक पुढे जाऊ लागला, थोडस आत गेल्यावर एक छोटी झोपडी त्याच्या दृष्टीस पडली, तिथे कोणी असेल तर त्यास विचारुया कुठे चांगलं लाकूड मिळेल. छोट्या लाकडांचा एक भार घट्ट बांधून झोपडीच्या दिशेने निघाला. जस जसा तो जवळ जात होता, काहीतरी शिजत असल्याचा वास येत होता. 

झोपडीपाशी पोचल्यावर चहाचा कडक वास, त्याला उत्साहित करू लागला. चहा पिऊन निदान 2 महिन्यापेक्षा जास्त काळ गेला होता.  कसा-बसा एक वेळ खायची सोय झाली तरी समाधान वाटणाऱ्या चहाचा कडक सुवास आकर्षित करत होता. झोपडी जवळ जाताच त्याने हाक दिली. 

"कोणी आहे का?"

"आत कोणी आहे का?", मोठ्याने  ओरडला.

"आलो...!", एक भारदस्त आवाज झाला.

काही क्षण शांतता पसरली, झोपडीच दार उघडलं गेलं. 50 शी पार केलेला, पांढरी दाढी, मोठे केस, अंगावर जाड कपडे आणि हातात काठी असलेलं एक 
व्यक्तिमत्त्व त्याच्या समोर येऊन उभं राहील.

"कोण आहेस तू? इथं पहिल्यादाच पाहतोय तुला" 

"हो, काही महिण्यापासून इथेच आहे मी!"

"का? " समोरून काहीच उत्तर आले नाही. दाढीवाल्या इसमाने त्यावर गहरी नजर टाकली.

"काय हवंय तुला?  हाका का मारत होता?"
"रात्री साठी लाकडं शोधत होतो, मोठी सुक्की लाकडं शोधत ईथपर्यंत आलो, तुम्हाला माहिती आहेत का कुठे मिळतील ते ?"

दाढीवाला इसम परत त्याकडे गंभीर नजरेने पाहू लागला.

"ये इथे बस, चहा पी", 

खूप दिवसापासून चहा प्यायला नव्हता आणि इथे समोरून कोणीतरी देत आहे, त्यामुळे तो तिथे निमूट पणे झोपडी बाहेरच्या एका लाकडी ओंडक्या शेजारी बसला. 

दाढीवाले गृहस्थ आत गेले आणि चहा घेऊन आले.

" हा घे !, नीट पकड गरम आहे." 

चहा घेऊन तो, हळू हळू पिऊ लागला. हृदय सुखावून टाकणारा घोटभर चहा, विचारांच्या कपातून, जिभेवर रेंगाळत, शरीरात जाऊन त्याला वेगळीच ऊर्जा देत असल्याचे, त्याला भासत होते.

"सुकी लाकडं पाहिजेत व्हय तुला?"  हे  वाक्य कानावर येताच त्याने झोपडीवाल्या गृहःथा कडे पहिले.

"हो! रात्रीला थंडी वाढते त्यासाठी हवी आहेत"

"तुझ्या कडे बघून वाटत नाही तू गरीब आहेस आणि तिथे स्वखुशीने आला आहेस, तुझी भाषेवरूनच कळतं तू शिकलेला मुलगा आहेस." थोडस गंभीर होऊन त्या इसमाने विचारले.


या प्रश्नाच उत्तर त्यास अर्थातच द्यायचे नव्हते, म्हणून तो काहीच न बोलता, चहा पीत राहिला. 

"तू, border क्रॉस करून पलीकडे जाण्यासाठी आला आहेस?", दाढीवाल्या इसमाने विचारले 

या प्रश्नाने आता तो ही गंभीर झाला, तो काही बोलला नाही, त्या दाढीवाल्या कडे बघू लागला, काही बोललो आणि समोरच्या व्यक्ती धर्मांध निघाली तर मला इथून काढता पाय घ्याल लागेल हे त्यास कळून चुकलं होत. 

तरीसुद्धा त्या दाढीवाल्या कडे पाहून त्याला आपण या संकटातून वाचू शकतो अशी आशा वाटू लागली. 

त्याच्याजवळ येऊन दाढीवाला इसम म्हणाला, 

"तुला जायचे असल्यास मी तुला पोचवू शकतो"?

"हा माणूस आहे तरी कोण? माझ्या मनातलं तर नाही ना ऐकत आहे?
हा इतक्या सहजपणे मला जे हवय ते का म्हणतोय?
हा कोणी हेर तर नाही ना ? माझ्या वर पारख ठेवून आहे आणि मीच त्याच्या कडे येऊन पोचलोय???" 

अश्या प्रश्नांनी तो गोधळून गेला, त्याला आता काही कळत न्हवत काय बोलावं आणि काय करावं. त्याचे हातपाय गळू लागले. तरी कसाबसा धीर आणत, दाढीवाल्याकडे मिश्किल पण फसवे हास्य आणत म्हणाला, 

"त्या देशात ? कशाला तिथे अस काय खास आहे ?"

"तो देश म्हणजे पूर्ण जग फिरण्यासाठीचा रस्ता खुला करून देणारं दार आहे, त्या देशाचे इतर बहोत देशांशी चांगले संबंध आहेत. 

आपल्या देशासारखा तो देश कट्टर नाहीय आणि सर्वांना त्यांच्यासोबत काम करायचे आहे."

"ठीक आहे चला मग आपण दोघे जाऊया?"

"हा हा हा", मिश्किल हास्याने दाढीवाल्याने त्याची पाठ थोपटली.

"2 दिवसानंतर ये तुला दाखवतो तो देश "

त्याने हसून, होकारार्थी मान डोलवली. 

"माझ्याकडे आहेत काही लाकडं त्यातली काही घेऊन जा!", 

थोडासा गूढ आणि साडेतोड बोलणारा इसमाकडे पाहून तो म्हणाला 

"नाही, नको!  तुम्ही मेहनतीने जमा केली आहेत. तुम्ही फक्त मला सांगा जंगलात सुकलेलं  मोठं झाड कुठे आहे ते, मी जाईन "

"बेटा, जा घेऊन आणि परवा नक्की ये, जर खरच तुला तो देश बघायचा असेल तर, आणि सकाळी ये, मी वाट बघेन तुझी "

"ठीक आहे ", त्याच्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले.

राञ होऊ लागली होती म्हणून, लग्गेचच लाकडं गोळा करून, त्याने दाढीवाल्या इसमाचा निरोप घेतला. 

म्हताऱ्या  इसमाकडून थोडीशी लाकडं आणि मनात खुपसारे प्रश्न घेऊन त्याने आपल्या झोपडीच्या दिशेने प्रस्तान सुरू केले.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या