गोधडी (भाग 3) Godhadi Part 3

खाडीजवळ एक पडकं घर होत, तेथे सहसा कोणीही राहत नसे. काही जण त्या उसाट जागेचा वापर पत्ते खेळण्यासाठी तर काही जण दारू पिण्यासाठी करत होते मात्र त्यादिवशी पाऊस असल्यामुळे तेथे कोणी नव्हते. जयेश एकटाच त्या पडक्या घराच्या ओटीवर बसून समोर दिसणारे पाणीच पाणी बघत होता. त्याच्या डोक्यात विचार चक्र सुरू होत पुढे कसे शिकावे आणि सर्व ह्याच. 

तसेच सकाळी आजी सोबत झालेल्या वादातून त्याला अजून मनात कुठेतरी भार आल्यागत वाटतं होतं. बराच वेळ तिथे घालवल्यावर त्याला आता घरी जावं असं सुचलं आणि तो निघाला. तसाच भिजत घरच्या दिशेकडे जाताना त्याला भूक जाणवत होती. 

साहिल आणि त्याचे बाबा येत असल्याचे त्याने थोडे लांबून  पाहिले आणि त्याला समजल की आपल्या आजीनेच ह्यांना इथे पाठवलं आहे असावं करून. साहिल ने जोरात आवाज दिला व ते दोघे त्याच्या अधिक जवळ जाऊ लागले. 

"क्या रे तू आजी को क्यू तकलीफ देता है ? "
"तेरी वजह से वो कितनी परेशान हैं और तू एक हैं यहा कबसे पडा है?" 

साहिल ने लगेचच मधे मध्यस्थी करत हळू आवाजात त्याच्या बाबांच्या कानात काही बडबडला आणि त्याच्या हातातील छत्री जयेंशला देत म्हणाला 

"दोस्त हे घे आणि घरी चल आजी वाट बघतेय." 
जयेश ने चुपचाप छत्री घेत घराकडची वाट धरली.

अंग चिंब भिजून गेले होते. दात थंडीने कडकड करत होते  आणि आता घराकडे अजून लवकर जावे म्हणून त्याचे पाय पटपटपुढे पुढे सरसावू लागले.

आजी सोबत झालेल्या भांडणात तो सकाळी काहीही न खाता घराबाहेर पडला होता व तसेच पाण्यात चिंब भिजल्याने त्या खाडीवरील घोंघावणार वारा सर्वच त्याच्या अंगाशी येऊन ठेपलं होत.

कसे बसे करत त्याने  गावात शिरकाव केला आणि धावत धावत घरात जाऊन पडला. आजी त्याच्या मागे धावत धावत आली साहिल सुद्धा आला. पाऊस अजून वाढत होता  आणि जयेश चे अंग तापाने पार गरम झाले होते. 

आजी आणि साहिल ने त्याला उचलून चटई वर निजवले, आजीने त्याचे तळवे चोळू लागली. त्याला आलेला ताप इतका असह्य होता की जयेश च्या तोंडातून एक शब्दही निघत नव्हता. आजीने झटपट डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवल्या ह्या इतक्या पावसात डॉक्टर कडे जायचं तर ते शक्य नव्हतंच तरीही आजी काही थांबणार नव्हती. तिचा नातूच  तिच्यासाठी सर्वस्व होतं. 

"तू थांब ह्याच्या जवळ मी डॉक्टरला घेऊन येते", आजीबाई ने मोडकी छत्री उघडत डॉक्टर च्या दिशेकडे निघाली. गावात एकच वैद्य होता तो सुद्धा त्याच्या जवळच्या नातेवाईकच्या घरी काही खाजगी कारणासाठी गेला होता.आजी निघाली आणि गावाच्या जर बाहेर एके ठिकाणी एक नवीनच दवाखाना उघडून ४ ,५ महिने झालें होते.


ती घाईघाई करत तो दवाखाना गाठते आणि डॉक्टर ला त्वरित घरी येण्याची विनंती करते. डॉक्टर त्यांच्या गाडीतूनच आजीला घेऊन गावाकडे येतात. लगबघिने आजी त्यांना घेऊन घरात येते. डॉक्टर जयेशला तपासतात आणि ताप कमी होण्यासाठी चे इंजेकॅशन देतात, सुईच्या टोकाने त्याने आ आ म्हणत डोळे मिटले. काही काळजी करू नका आजी अर्ध्या तासात ताप उतरेल फक्त आता एक काम करा त्याच्या जवळ कोणी जाऊ नका आणि एक चादर डोक्यावरून त्याच्या पायापर्यंत घाला. त्याला जेवढी गर्मी देत येईल तेवढी द्या घाम आला की तापही निघून जाईल आणि अशक्तपणाही. 

आजीने डॉक्टरांचे आभार मानले आणि त्यांच्या फीस बद्दल विचारले. एक पडक्या घरात मोडलेल्या छत्रीने आपल्या पर्यंत इतक्या जोरदार पावसात स्वतःच्या काळजाच्या तुकड्यासाठी आलेल्या आजीकडून खरंचपैसे घ्यावेत का? हा विचार त्या डॉक्टरच्या मनात खदखदत होता. साहेब सांगा किती झाले? गावातला वैद्य त्याने स्वतः बनवलेली औषधे देतो आयुर्वेदिक त्यामुळे त्याला जास्त पैसे लागतनाही तो वैद्य आज नाही म्हणून झपाट्याने तुमच्या जवळ आले मी आता इंजेकशन  म्हणजे जास्तच झाले असतील माझ्या कडे काही साठलेले पैसे आहेत आणि उरलेलंही गोधडी विकून मिळतील तेव्हा तुमच्या कडे मी घेऊन येईल अस आजी दबक्या स्वरात म्हणाली. 

"आजी मग तुम्ही एक काम करा, मलाच ती गोधडी द्याल का?"

आजी थोड्या गोंधळात पडली. 
"काय?"
"आजी मला गोधडी हवी आहे तुम्ही ती द्याल का?"

इतके दिवस मेहनत करून विणलेली गोधडी ह्या डॉक्टर ला फुकट कशी द्यायची? आजी जर ओशाळली. पण आजी ने आपला शब्द तोंडातच ठेवला, "ठीक आहे घेऊन जा.थोडा वेळ थांबा शेवटचा घाव घालायचा बाकी आहे तुम्ही बस मी चहा बनवते तोवर घाव पण घालून होईल." असे म्हणत  चूल पुन्हा पेटवून आजीने चहा ठेवला. 

"साहेब तुम्हाला कोरा चहा चालेल ना, घरात दुध नाही, चालेल का? " 
"आजी नक्की चालेल" डॉक्टर म्हणले  

चहाचा उकळा डॉक्टरच्या हातावर ठेवत आजीने पटापट घाव मारले आणि गोधडी तयार केली. आजीच्या ह्या कौशल्याचे डॉक्टर  ही नवल वाटत होते.आजीने गोधडी दुमडून त्याची नीट घडी घातली व डॉक्टरकडे घेऊन जाऊ लागली.

डॉक्टरने आधीच पाकिटातून पैसे काढले. आजीला विचारले, 
"किती ह्याचे आजी?" 
"अहो हे काय करताय तुम्ही तुमची फी सुद्धा घेतली नाही आणि वरून मला ह्याचे पैसे देताय." 

"हो आजी,आजी माझी फी तुमच्या संघर्षा पेक्षा मोठी नाही. तुम्ही जितक्या मायेने,प्रेमाने, तुमच्या हळुवार स्पर्शाने,म्हाताऱ्या हाताने इतक्या सुंदरतेने आणि एकाग्रतेने ही गोधडी विणली आहे ना, की त्याचे वर्णन मी शब्दात नाही करू शकत तुम्ही हवं तर ह्या गोधडी च्या पैशातून  फक्त माझी फी ५०रुपये कापुन घ्या." 

माणुसकी जिवंत असल्याचे दर्शन आजीला होत होते. साहेब खूप आभारी आहे तुमची.अस सांगत हातावर गोधडीचे योग्य ते पैसे देते डॉक्टर तिथून निघाले.

पाऊस हळूहळू थांबत होता.आज डॉक्टरला ही चुलीवरचा उकळा पिऊन बरे वाटले होते.

डॉक्टरने दिलेले पैसे तसेच ओटीत खुपसून आजी नातवाजवळ ठमोठाम बसून होती आणि तो जागा व्हायची वाट बघत होती. काही वेळाने जयेश हलकेच डोळे उघडत उठला. इंजेवशन इतकं जास्त परिणाम कारक होत की त्याला पुन्हा झोप येत होती. आजीने जवळजाऊन ताप तर नाही ना ह्याची खात्री करून घेतली. ताप पूर्ण गेला होता व त्याचे अंग घामाने भिजत होते आपल्या अंगावरील गोधडी बाजूला सारत तो पुन्हा एका कुशील वळून झोपला. 

आजी त्याच्या कडे बघत स्मितहास्य करत तशीच त्याच्या बाजूला बसून राहिली.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या