About Us

Marathi Short Story 


शाळा-कॉलेज मध्ये असतानाच अनेक निबंध-कथा लिहल्या आणि त्याहून जास्त मनातच राहिल्या. शाळेच्या चाकोरी मधले विषय,कथा आणि नेहमीच्याच बोअर पद्दतींचा त्याग करून, आपल्या आजू-बाजूच्या, रंगीत, जिवंत कथा लिहाव्यात अशी खूप इच्छा होती. कधी तरी सुरुवात करावी, स्वतःच एक ब्लॉग असावा असं नेहमी वाटत होत. हळू हळू गर्दीतल्या मित्रांतून काही हौसे-नौसे-गौशे एकत्र येऊन एक टोळी बनली आहे.कविता कथा आणि लेखण यावर प्रेम करणाऱ्या या टोळी मार्फत च या सर्व कथा लिहल्या जात आहेत. 

या कथांमध्ये प्रमुख करून सामाजिक, कौटुंबिक विषयांवर स्पर्श केला जाईल. तरी लेखकानीं आपली लिबर्टी वापरून अनेक विषयांत आपल्याला  गुंतवून ठेवल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही. 

आपण कितीही स्वतंत्र पणे लिहणारे असलो तरी Google साहेबांना काही गोष्टी आवडत नाही. त्यामुळेच google साहेबांनी सांगितलेल्या नियमांचे पाळण करुनच  कथा लिहल्या जातील.

कथा आणि लेख यांचे सर्व प्रकारचे हक्क लेखकांकडे जपून ठेवण्यात आले आहेत. लेखकांच्या संमत्ती शिवाय कोणत्याही प्रकारे  इतर वेबसाईट आणि Portal वर कथा कॉपी आणि Share करण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही पण तरी त्या प्रकारची परवानगी साठी आमच्याशी संपर्क साधू शकता. परवानगी देण्याचे सर्व हक्क लेखकाकडे असल्याने त्यांनी घेतलेला निर्णय अंतिम असेल.


कथा पाठवायच्या असल्यास ?

तुमच्या जवळ, तुमच्या स्वतःच्या, हक्काच्या कथा असतील तर तुम्ही आम्हास पाठवू शकता, कथेतील आशय आणि भाषा तपासल्यावर आम्ही ती कथा आमच्या Website  वर Publish  करू शकतो. 

marathishortstory@gmail.com तुम्ही ई-मेल करून आपल्या कथा पाठवू शकता.

कथे सोबत आपल नाव, फोटो तसेच  इतर माहिती द्यायची असल्यास तीही पाठवू शकता.